Aaditya Thackeray : गद्दार अधिवेशनाला आले, पण नजरेला नजर भिडवू शकले नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूच

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे. अलिबाग येथे ही शिवसंवाद यात्रा पोहोचली. आदित्य ठाकरे यांची ज्या ठिकाणी सभा झाली, त्याच्या बाजूलाच भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्यामुळे या सभेची जोरदार चर्चा होती.

Aaditya Thackeray : गद्दार अधिवेशनाला आले, पण नजरेला नजर भिडवू शकले नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूच
गद्दार अधिवेशनाला आले, पण नजरेला नजर भिडवू शकले नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूचImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 8:47 PM

अलिबाग: आम्ही गद्दार नाही. आम्ही बंड केलं नाही. आम्ही उठाव केला. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणू नका, असं शिंदे गटाचे आमदार वारंवार सांगत आहे. तर शिवसेनेचे (shivsena) ) नेते आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. जिथे संधी मिळेल तिथे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवत आहेत. आज अलिबागमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा होती. या सभेतही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. आज गद्दार अधिवेशनाला आले होते. पण ते नजरेला नजर भिडवू शकले नाहीत. त्यांची हिंमतही झाली नाही. कारण ते 40 जण गद्दार आणि निर्लज्ज आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीत (maha vikas aghadi)  जे मंत्री होते. त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यामुळे आमचा गेम झाला असं त्या आमदारांना वाटत असेल, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे. अलिबाग येथे ही शिवसंवाद यात्रा पोहोचली. आदित्य ठाकरे यांची ज्या ठिकाणी सभा झाली, त्याच्या बाजूलाच भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्यामुळे या सभेची जोरदार चर्चा होती. पहिल्या बॅचमध्ये गेलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. महाविकास आघाडीत जे मंत्री होते त्यांनाच स्थान मिळालं आहे. आमचा गेम झाला असं त्यांना आता वाटत असेल. आपण ह्या गेलेल्या लोकांना गरजेपेक्षा जास्त प्रेम आणि प्रतिष्ठा दिली, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हे सरकार कोसळणारच

झेंडा वरती ठेवा. मी दिसलो नाही तरी चालेल पण आपला भगवा झेंडा वर दिसला पाहिजे, असं सांगतानाच हे गद्दार लोकांचं सरकार आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार. शिंदे गटाच्या आमदारांचे चेहरे पाहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी होती. तुमच्यासोबत होतो तेव्हा बरं होतं. शिंदेंसोबत गेलो आणि गेम झाला, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते, असंही ते म्हणाले.

मंत्रिमंडळात रायगडचा कोणी नाही

आपल्या सरकारमध्ये आपण पहिला निर्णय रायगडासाठी घेतला. मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आपण रायगड किल्ल्याला 600 कोटी रुपये देऊन केला. गद्दार लोक आज अधिवेशनात आले. पण नजरेला नजर भिडवू शकले नाहीत. राज्यात सुपर सीएम आहे. मंत्रिमंडळात आपल्या रायगडचा कोणी नाही. महिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.