सोलापूर : शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाला. सावंत हे त्यांचा मतदारसंघ असलेल्या भूम-परंड्याहुन पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. पुणे – सोलापूर महामार्गवरील वरवंड येथे तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात जाला. या अपघातामधून तानाजी सावंत बालंबाल बजावले आहेत. फक्त गाडीचं किरकोळ नुकसान झालंय. थोडक्यात मोठा अनर्थ या अपघातातून टळलाय. शनिवारी रात्री सावंत हे त्यांच्या मतदार संघातील एक कार्यक्रम आटोपून रात्री निघाले होते. पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघाताचं कारण नेमकं कारण कळू शकलेलं नाही. रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. मात्र या अपघातातून सावंत थोडक्यात बचावल्यानं सुटकेचा निश्वास सोडलाय.
उस्मानाबादेत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं होतं. एक वेळ घरी बसेन, पण दुसऱ्या कुठल्याच पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही, असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं. शनिवारी उस्मानाबादेत शिवसंपर्क अभियानावेली त्यांनी हे विधान केलं होतं.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदापासून डावलल्यानंतर तानाजी सावंत शिवसेनेपासून दुरावल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत हे शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. स्थानिक नेत्यांची त्यांचे खटके उडत असल्याचीही कुजबूज सुरु होती. या सगळ्या चर्चांना माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी शनिवारी केलेल्या भाषणातून पूर्णविराम लावला होता.
आमदार तानाजीराव सावंत यांना कसलीही दुखापत झालेली नसून ते सध्या पुण्यातील घरी आहेत. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन तानाजी सावंत यांचे बंधू शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी ‘tv9मराठी’सोबत बोलताना केलंय.
शिवसेनेचे माजी मंत्री परांडा तालुक्याचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या गाडीचा अपघात सोलापूर पुणे महामार्गावर वरवंड ता. दौंड येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झाला. टोयोटा कंपनीच्या लँड क्रुझर कारगाडीमधून उस्मानाबाद येथून पुण्याकडे जात असताना कंटेनरची सावंत यांच्या गाडीच्या उजव्या बाजूला जोरात धडक बसली होती. एका बाजूची काच फुटली आहे. मात्र, यात आमदार तानाजीराव सावंत यांच्यासह कोणालाही साधी दुखापत झालेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन आमदार सावंत यांच्या कुटूबियांनी केलं आहे. यवत पोलिसांत घटनेची नोंद झाली असून सावंत यांचे गाडीचालक यांनी कंटेनर चालक रोहित देविदास वाघमोडे (रा.सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.