Chandrakant Khaire | वडगाव कोल्हाटीत शिंदे गटाने शिवसेनेचे उमेदवार पळवले, माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप

वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीत मागील वेळी आम्ही 16 जागा निवडून आणल्या होत्या. या सगळ्यांना शिंदे गटानं पळवून नेलं. अमिष दाखवलं, असा आरोप खैरे यांनी केलाय.

Chandrakant Khaire | वडगाव कोल्हाटीत शिंदे गटाने शिवसेनेचे उमेदवार पळवले, माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप
पाचही बंडखोरांना आडवे करुImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 12:35 PM

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर (wadgaon Kolhati Bajajnagar) ग्रामपंचायतीत एकनाथ शिंदे गटाचा (Eknath Shinde Group) मोठा विजय झालाय. मात्र शिंदे गटाला भरपूर रसद मिळाली आहे. ही रसद वापरून त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पळवले आणि निवडून आणले असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलाय. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही9 शी बोलताना हा आरोप केला. राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल काल लागले. यात औरंगाबाद जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींचेही निकाल लागले. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले. 16 पैकी 12 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे पॅनल विजयी झाले तर दोन ठिकाणी मूळ शिवसेनेचे पॅनव विजयी झाले. मात्र शिंदे गटाने पैशांचा वापर करून निवडणूक जिंकल्याचा आरोप खैरे यांनी केलाय.

खैरेंचा आरोप काय?

संपूर्ण औरंगाबादचं लक्ष लागलेल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत शिंदे गटाने रसद वापरल्याचा आरोप खैरे यांनी केलाय ते म्हणाले, ‘ त्यांच्याकडे रसद खूप मोठी होती. एकेका आमदारांना किती रसद मिळाली हे माहितीय सर्वांना… वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत निवडणुकीत मागील वेळी आम्ही 16 जागा निवडून आणल्या होत्या. या सगळ्यांना शिंदे गटानं पळवून नेलं. अमिष दाखवलं. आमच्याही लोकांना मतं मिळाली.. पराभूत उमेदवारांचीही मत लक्षणीय आहेत, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

‘शिवसेना त्यांची नाहीच..’

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शिंदे गटाचा विजय झाला, त्यांचं अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना असाच शब्द वापरलाय. सोशल मीडियावर हे पोस्टरही व्हायरल होत आहेत. यावरून बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘ त्यांची शिवसेना नाही. शिंदेगट आहे. भाजप आणि शिंदे गट अशी युती आहे. शिवसेना ही फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची आहे. बळजबरी कुणी म्हणू नये…. असा सल्ला माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलाय.

खैरेंची स्थिती संजय राऊतांसारखी होईल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंना इशारा दिला. त्यांची स्थितीही संजय राऊतांसारखी होईल, असे शिरसाट म्हणाले. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, माझी काळजी करू नका. तुमचं पहा. तुमचंच काय झालंय, त्यावर लक्ष द्या… मी एकदम क्लियर माणूस आहे. माझं काही तुमच्यासारखं एक एकर बंगल्याचं काम चालू नाही. शेती नाही. त्यामुळे मी स्वतः लहनशा घरात राहतो. तुम्हाला चौकशी करायची असेल तर करू शकता….

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.