Maharashtra politics : दिल्लीसमोर न झुकण्याची महाराष्ट्राची परंपरा; मात्र आज मुख्यमंत्री दिल्लीच्या वाऱ्या करतात, किशोरी पेडणेकरांचा शिंदेंना टोला
महाराष्ट्राची परंपरा दिल्लीसमोर न झुकण्याची आहे. आज मात्र मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याची टीका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली आहे.
मुंबई : शिवसेना (shiv sena) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदार आणि भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. आज जे काही घडत आहे ते सर्व जण आपण पहातच आहोत. हे कोणी आणि का घडवले हे सुद्धा सर्वांना माहित आहे. फडणवीसांच्या पत्नी म्हणाल्या होत्या की फडणवीस वेशांतर करून आमदारांना भेटायला जायाचे. त्यामुळे हे काही आत्ता लगेच घडले नाही. दिड वर्षापासून हे षडयंत्र चालूच होते. त्यामुळे हे सर्व गेले आहेत. फक्त जातानी काहीतरी कारणे सागंत आहेत. जे गेले त्यांना जाऊद्या. आता जे शिवसैनिक उरले आहेत, त्यांना घेऊन पुन्हा शिवसेना उभी करू असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. शेगडीवर दुध ठेल्यावर दूध उतू जाते, तसे आता शिवसेनेत काही दूध उतू गेले आहे. काही मोठे आजगर तिकडे गेले आहेत, म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे.
भाजपाला शिवसेना संपवायची होती
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या हे बोलताना वैयक्तिक पातळीवर टीका करायचे. त्यांना शिवसेना संपवायची होती. आमच्यातील काही लोकांनी त्यांना साथ दिली आणि शिवसेनेत फूट पडल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मात्र आता जे लोक शिवसेनेसोबत आहेत, त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेची उभारणी करणार आहोत. आम्ही अशावादी आहोत की, ज्या लोकांनी बंडखोरी केली त्यातील काही लोक उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटील परत येतील. आजही दीपक केसकर यांच्या मनात कुठेतरी शिवसेनेची ज्योत धगधगत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत दुसरा महापौर बसत नाही तोपर्यंत मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एकनाथ शिंदेंवर टीका
सी. डी. देशमुखांनी मी दिल्लीसमोर झुकणार नाही असं म्हणत राजीनामा दिला होता. महाराष्ट्राची परंपरा दिल्लीसमोर न झुकण्याची आहे. आज मात्र मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याचे म्हणत पेडणेकरांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसेच जे लोक अतिधोकादायक इमारतीमध्ये राहातात त्यांनी ताक्ताळ त्या इमरती खाली कराव्यात असेही यावेळी पेडणेकर यांनी म्हटले आहे.