आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही, गरूड हवी तशी झेप घेतो; दसरा मेळाव्यावरून निलम गोऱ्हेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिंदे गटाचा देखील मेळावा होणार असल्यानं कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरून शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी  शिंदे गटाला जोरदार टोल लगावला आहे.

आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही, गरूड हवी  तशी झेप घेतो; दसरा मेळाव्यावरून निलम गोऱ्हेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 10:19 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवर होणार की नाही होणार यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. अखेर हाय कोर्टाकडून शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे यंदा शिंदे (Eknath Shinde) गटाचा देखील मेळावा होणार असल्यानं कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरून शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी  शिंदे गटाला जोरदार टोल लगावला आहे. आम्हाला गर्दी जमवण्याची आवश्यकता नाही. झेप घेताना गरूड स्वत:ला जशी पाहिजे तशी झेप घेतो असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाल्या गोऱ्हे?

कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून सध्या ठाकरे आणि शिंदे गटात स्पर्धा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. यावरूनच दोन्ही गटामध्ये आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. या वादावर आता शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्याला आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही. झेप घेताना गरूड स्वत:ला जशी पाहिजे तशी झेप घेतो असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

मोठ्या साहेबांची बाळासाहेब ठाकरे यांची जेव्हा सभा व्हायची तेव्हा कष्टकरी वर्ग आणि शेतकरी या सभेत सहभागी होण्यासाठी आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायचा. आदित्य ठाकरे यांच्या ज्या सभा झाल्या त्या सभेत देखील मोठ्या संख्येनं कष्टकरी समाज सहभागी झाला होता. त्यामुळे आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नसल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाला टोला

ज्यांना सभेला गर्दी जमवायची आहे त्यांनी ती जमवावी, त्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम असल्याचा टोलाही गोऱ्हे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

टकल्या लोकांच्या डोक्यावर पुन्हा केस पण आता 'या' नव्या आजारानं ग्रासलं
टकल्या लोकांच्या डोक्यावर पुन्हा केस पण आता 'या' नव्या आजारानं ग्रासलं.
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, राणेंची मागणी अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, राणेंची मागणी अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र.
'तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड नको', तृप्ती देसाईंना कोणाचा सल्ला?
'तृप्तीताई शांत रहा, धर्मात लुडबुड नको', तृप्ती देसाईंना कोणाचा सल्ला?.
'जरा थांब, घाई कशाला...'; पालकमंत्रिपदावर गोगावलेंचं मिश्किल उत्तर
'जरा थांब, घाई कशाला...'; पालकमंत्रिपदावर गोगावलेंचं मिश्किल उत्तर.
पुण्यात एकाच दिवसात ७ जणांनी आयुष्य संपवलं; टोकाचा निर्णय घेत...
पुण्यात एकाच दिवसात ७ जणांनी आयुष्य संपवलं; टोकाचा निर्णय घेत....
'देशमुखांच्या आरोपींना फासावर चढवा अन्...', मुंडेंची मोठी मागणी काय?
'देशमुखांच्या आरोपींना फासावर चढवा अन्...', मुंडेंची मोठी मागणी काय?.
'सध्या मी टार्गेटवर, मी दोषी आहे...', धनंजय मुंडे राजीनामा देणार का?
'सध्या मी टार्गेटवर, मी दोषी आहे...', धनंजय मुंडे राजीनामा देणार का?.
विधानसेभेनंतर मनसेचा पहिला मेळावा, राज ठाकरे उद्या मोठे निर्णय घेणार?
विधानसेभेनंतर मनसेचा पहिला मेळावा, राज ठाकरे उद्या मोठे निर्णय घेणार?.
धसांनी कराडवर आरोप केलेला हाच 'तो' लातूरचा अलिशान बंगला, बघा व्हिडीओ
धसांनी कराडवर आरोप केलेला हाच 'तो' लातूरचा अलिशान बंगला, बघा व्हिडीओ.
प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10हून अधिक मृत्यू; नेमक काय घडलं?
प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, 10हून अधिक मृत्यू; नेमक काय घडलं?.