Priyanka Chaturvedi : गद्दारी, विश्वासघात शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी; त्यांनी पाठीत खंजीर खूपसला, प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते, कोणासोबत गद्दारी करायची नाही, मात्र तुम्ही तर पाठीत खंजीर खूपसल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

Priyanka Chaturvedi : गद्दारी, विश्वासघात शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी; त्यांनी पाठीत खंजीर खूपसला, प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 1:03 PM

मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते, कोणासोबत गद्दारी करायची नाही, मात्र तुम्ही तर पाठीत खंजीर खूपसल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली असल्याची जोरदार टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आणखी दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. या दहा दिवसांमध्ये जी मनमानी करायची ती करा. मात्र 22  तारखेला कोर्टाचा निकाल येईल. त्यानंतर पुढील सर्व रात्री या शिंदे गटासाठी काळोखाच्या रात्री असतील. आम्हाला विश्वास आहे की न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाल्या चतुर्वेदी?

प्रियंका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली आहे. पुढील दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. 22  तारखेला कोर्टाचा निकाल येईल. त्यानंतर येणाऱ्या सर्व रात्री या शिंदे गटासाठी काळोख रात्री असतील. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये काय मनमानी करायची ती करून घ्या. तुम्ही पाठीत खंजीर खूपसला, बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते, कोणासोबतही गद्दारी करायची नाही. मात्र आता गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

दरम्यान यावेळी त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ या सर्वज्ञानी आहेत, मात्र सध्या पक्षात त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. संजय राठोडांविरोधात त्यांनी एवढा संर्घष केला मात्र त्यांचे पक्षात कोणही ऐकले नसल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.