‘ठाकरे कुटुंबीयांनी जमीन घेतली तेव्हा फडणवीसांचे सरकार होते, मग तेव्हाच चौकशी का केली नाही?’
2014 साली ही जमीन विकत घेतली आहे. 2014 पासून भाजपचे सरकार होते. | Ravindra Waikar
मुंबई: ठाकरे कुटुंबीयांनी 2014 मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून जमीन घेतली. त्यावेळी फडणवीस सरकारची सत्ता होती. मग भाजपने तेव्हाच या जमीन व्यवहाराची चौकशी का केली नाही, असा सवाल शिवसेना नेते रवींद्र वायकर (Ravindra Waikar ) यांनी उपस्थित केला. तर किरीट सोमय्या हा माणूस मनोरुग्ण आहे. वेड लागल्यामुळे ते कुठेही काहीही बरळत असल्याची टीकाही यावेळी रवींद्र वायकर यांनी केली. (Shivsena leader Ravindra Waikar slams Kirit Somaiya)
2014 साली ही जमीन विकत घेतली आहे. 2014 पासून भाजपचे सरकार होते. त्यामुळे इतक्या दिवस चौकशी का झाली नाही? तर अन्वय नाईक यांनी 2018 साली नाईक यांनी आत्महत्या केली. त्याचीही आतापर्यंत चौकशी का झाली नव्हती, असा सवाल वायकर यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या हे खासदारकी गेल्यामुळे वेडे झाले आहेत. त्यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे. अशा लोकांना केराची टोपली दाखवली पाहिजे असे रवींद्र वायकर यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेत शिवसेनेवर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यांनी आपल्याकडे ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे असल्याचा दावा केला होता. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे.
किरीट सोमय्या या सततच्या आरोपांमुळे आता शिवसेनाही प्रचंड आक्रमक झाली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांना दिवाळीनंतर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.
सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही; गुलाबराव पाटलांचा घणाघात कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या:
किरीट सोमय्या पाणचट माणूस, कुणीही भागीदारी करु शकतो, कुठलीही चौकशी करा : रवींद्र वायकर
एकदा किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या, दिवाळीनंतर आम्ही सुरु करु: शिवसेना
ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल
(Shivsena leader Ravindra Waikar slams Kirit Somaiya)