मुंबई : शिवसेनेचे उपनेते माजी खाजदार शिवाजी आढळराव पाटील (Shiv Sena leader Shivajirao Adhalarao Patil ) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Sarkar) घरचा आहेर दिला आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणात (remdesivir injection) राज्य सरकारने अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे (Abhimanyu Kale) यांच्या बदलीला आढळराव पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. अभिमन्यू काळे यांची बदली अतिशय चुकीची आणि निषेधार्ह आहे, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. (Shiv Sena leader Shivajirao Adhalrao Patil opposes Maharashtra FDA chief Abhimanyu Kale transfer)
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, “अभिमन्यू काळे यांना मी जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहित नजरेसमोर ठेवून, त्यांनी आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरं जावं लागलं आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एका प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे. जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्याला माझा जाहीर पाठिंबा आहे”, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं.
रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवारी 20 एप्रिलला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
एफडीए आयु्क्त काळे यांनी दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.
कोण आहेत अभिमन्यू काळ?
राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. भाजप नेत्यांच्या विनंतीवरुन महाराष्ट्राला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यायला तयार झालेल्या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले. ही घटना योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या मालकांना दमदाटी करून त्रास देणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या
VIDEO: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोलीस ठाण्यात, पोलीस अधिकाऱ्यांना का घेतलं फैलावर?; वाचा, सविस्तर
रेमडिसिव्हरसाठी भाजपला पत्र देणारे FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली, आव्हाड म्हणतात, मुजोर अधिकारी
भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं: राजेंद्र शिंगणे
(Shiv Sena leader Shivajirao Adhalrao Patil opposes Maharashtra FDA chief Abhimanyu Kale transfer)