किरीट सोमय्या यांना सुषमा अंधारे यांचे 4 सवाल; म्हणाल्या, मी तुमचं शिष्यत्व पत्करते, पण उत्तर द्या

कुठे काळं फासलं असेल, महिलांवर अत्याचार होत असतील आणि महिलांवर गरळ ओकली जात असेल या सर्वांवर मी फक्त फडणवीस यांनाच प्रश्न विचारते. गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का?

किरीट सोमय्या यांना सुषमा अंधारे यांचे 4 सवाल; म्हणाल्या, मी तुमचं शिष्यत्व पत्करते, पण उत्तर द्या
किरीट सोमय्या यांना सुषमा अंधारे यांचे 4 सवाल; म्हणाल्या, मी तुमचं शिष्यत्व पत्करते, पण उत्तर द्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 1:08 PM

मुंबई: जे लोक संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाला आणि गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसीत कोरोडो रुपयांचा चुराडा झाला त्याचा हिशोब कधी देणार आहेत? मी किरीट भाऊंना वारंवार सांगते, मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. मी आरोप करत नाही, टीका करत नाही, मी तुम्हाला काहीच वाईट बोलत नाही. उलट मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण माझ्या दोन तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असं आव्हानच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या हे आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट किरीट सोमय्या यांनाच चार सवाल करून त्याची उत्तरे देण्याचं आव्हानच दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

अनिल परब यांच्या बंगल्याबद्दल तुम्ही बोलता. तो फार लांबचा पल्ला आहे. त्या आधी नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? हाच एक प्रश्न मी वारंवार तुम्हाला विचारत आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

तुम्ही इतरांना हिशोब विचारता तेव्हा भाजप आणि मित्र पक्षातील लोकांना हिशोब कधी मागणार आहात? असा दुसरा सवाल त्यांनी केला. जो पक्ष रजिस्टर्डच झाला नाही त्या पक्षाचा बीकेसीत मेळावा झाला. या मेळाव्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. तो खर्च कुणाच्या खात्यातून झाला यावर का बोलत नाही? असा सवालही त्यांनी केला.

भावना गवळी असेल, प्रताप सरनाईक असेल यशवंत जाधव असेल या लोकांना तुम्ही सरकार स्थापन करण्यापूर्वी माफीया माफीया म्हणत होता. तुमचा गळा सुकला होता.

त्यांना क्लिनचिट तर मिळालेली नाही. पण त्यांच्यावरती चार्जशीट कधी दाखल होणार आहे? ही कायद्याची मेख कळली पाहिजे. त्यावर किरीट भाऊ का बोलत नाही? असं त्या म्हणाल्या. किरीट भाऊंचं असं झालंय आपला तो फेकू आणि दुसऱ्यांचा तो पप्पू, असा चिमटाही त्यांनी काढला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.