Uday Samant : शिवसेनेचा आवाज उठवणं हे पक्षांतर्गत कायद्यात येत नाही, सर्वोच्च नायालयातील सुनावणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया

आम्ही शिवसेना सोडून कुठेही गेलेलो नाही आहोत, आम्ही शिवसेनेचा आवाज उठवलेला आहे. आणि शिवसेनेचा आवाज उठवणं म्हणजे पक्षांतर्गत कायद्याच्या अंतर्गत येत नाही. ही जी भूमिका आमच्या वकील यांनी मांडली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत.

Uday Samant : शिवसेनेचा आवाज उठवणं हे पक्षांतर्गत कायद्यात येत नाही, सर्वोच्च नायालयातील सुनावणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया
सर्वोच्च नायालयातील सुनावणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 3:10 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदार खासदारांच्या पक्षांतराबाबत न्यायालयात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी बाजू मांडली. या सुनावणीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या सुनावणीच्या बाबतीत आपण सगळ्यांनी आज पाहिलं त्यात असं स्पष्ट झालं की, निवडणूक आयोगाकडे जी पक्षांतर्गत सुनावणी सुरू आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने कुठेही आडकाठी केली असं वाटत नाही, असे उदय सामंत म्हणाले. परंतु कोणत्याही निर्णयाप्रत येऊ नये अशीच भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली आहे.

सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे आमचे लक्ष

हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचे की नाही याची सुनावणी सोमवारी होणार आहे. आमचे वकील हरीश साळवे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही शिवसेना सोडून कुठेही गेलेलो नाही आहोत, आम्ही शिवसेनेचा आवाज उठवलेला आहे. आणि शिवसेनेचा आवाज उठवणं म्हणजे पक्षांतर्गत कायद्याच्या अंतर्गत येत नाही. ही जी भूमिका आमच्या वकील यांनी मांडली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. आता पुढील सुनावणी सोमवारी होणार असून, याकडे आमचे लक्ष लागले आहे. आमची न्यायिक बाजू भक्कम आहे आणि निकाल आमच्यासोबत असेल, असा आम्हाला विश्वास आहे.

हल्ल्याकडे दुर्लक्ष करुन शिवसेना मोठी करण्याकडे लक्ष

सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला होता. याबाबत जो काही हल्ल्याचा प्रकार झाला त्याबद्दल मी कालच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आता मी त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेना कशी मोठी होईल याकडे लक्ष देणार आहे, असे सामंतांनी स्पष्ट केले आहे. नीलम ताई असतील किंवा विनायक राऊत असतील किंवा अरविंद सावंत असतील यांचे सर्वांचे स्टेटमेंट मी ऐकले आहेत. गुन्हा झाल्यानंतर असे स्टेटमेंट देण्याची प्रथा नवीन नाही जुनीच आहे. म्हणून मला पोलिसांचा तपास चालू असताना त्यात हस्तक्षेप करायचा नाही. ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला, त्यावेळी त्या ताफ्यामध्ये पोलीस सुद्धा होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहेत.

हे सुद्धा वाचा

काही पदाधिकाऱ्यांनी जाहीर सांगितले की, उदय सामंतांवर हल्ला झाला त्याचा आम्हाला आनंद आहे, ते आता देखील आत आहेत. आणि ही न्यायलयीन बाब आहे. न्यायालयाने त्यांच्यावर पोलीस कोठडी ठोठावली आहे. नीलम ताई किंवा अरविंद सावंत यांनी जी भूमिका मांडली आहे, प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्यावर मला काही बोलायचे नाही, असे सामंतानी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्ताराचा सुनावणीशी संबंध नाही

मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि या सुनावणीचा कुठेही संबंध नाही. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय हा मुख् मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील. कामकाज कुठेही ठप्प झालेले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जरी काम करत असतील तरीही चांगल्या पद्धतीने आणि सक्षमपणे ते काम करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला उपयुक्त असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन तीन दिवसात होईल, असं मला वाटतं. (Shiv Sena leader Uday Samant reaction to the Supreme Court hearing)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.