Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil : आधी समर्थकांना ‘जय महाराष्ट्र’चे मेसेज पाठवले, त्यानंतर गुलाबराव पाटील नॉट रिचेबल; शिवसेनेला दुसरा जबर हादरा?

शिवसेनेची मुलूख मैदानी तोफही नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे.

Gulabrao Patil : आधी समर्थकांना 'जय महाराष्ट्र'चे मेसेज पाठवले, त्यानंतर गुलाबराव पाटील नॉट रिचेबल; शिवसेनेला दुसरा जबर हादरा?
गुलाबराव पाटील
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:55 AM

मुंबई : शिवसेनेची (Shivsena) मुलूख मैदानी तोफ म्हणून परिचीत असलेले महाविकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) देखील नॅटरिचेबल असल्याच माहिती आहे. पाटील यांनी आधी समर्थकांना जय महाराष्ट्र पाठवलं आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आधी एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं आमदार (MLA) घेऊन गुवाहाटीमध्ये असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित राहिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे एक-एक आमदार गायब होत असल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उधाण आलंय. तर भाजपकडून सत्तेची तयारी सुरू असल्याच माहिती आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारचं टेन्शन वाढलं असून कधीही महाराष्ट्र सरकार कोसळू शकतं, असं बोललं जातंय.

आता गुलाबराव पाटील नॅटरिचेबल असल्यानं हे शिंदेंच्या गटात तर गेले नाहीत ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार त्यांच्यासोबत आहे. शिंदेंकडे किती संख्याबळ आहे, हे जाणून घेऊय…

हे सुद्धा वाचा

ठाणे जिल्हा (7 आमदार)

  1. एकनाथ शिंदे-कोपरी पाचपाखाडी
  2. प्रताप सरनाईक- माजिवाडा
  3. विश्वनाथ भोईर-कल्याण पश्चिम
  4. शांताराम मोरे-भिवंडी
  5. बालाजी किणीकर-अंबरनाथ
  6. गीता जैन-मिरा भाईंदर
  7. प्रकाश सुर्वे-मागाठाणे ————

औरंगाबाद जिल्हा (6 आमदार)

  1. अब्दुल सत्तार-सिल्लोड
  2. संदीपान भुमरे-पैठण
  3. संजय शिरसाट-औरंगाबाद पश्चिम
  4. रमेश बोरणारे-वैजापूर
  5. प्रदीप जैस्वाल-औरंगाबाद मध्य
  6. उदयसिंह राजपूत-कन्नड —————–

रायगड जिल्हा (3 आमदार)

  1. महेंद्र दळवी-अलिबाग
  2. महेंद्र थोरवे-कर्जत
  3. भरत गोगावले-महाड ————-

सातारा जिल्हा (2 आमदार)

  1. शंभूराज देसाई-पाटण
  2. महेश शिंदे-कोरेगाव ——-

सांगली जिल्हा (1 आमदार)

  1. अनिल बाबर-खानापूर ———–

कोल्हापूर जिल्हा (1 आमदार)

  1. प्रकाश आबिटकर-राधानगरी

    ———-

सोलापूर जिल्हा (1 आमदार)

  1. शहाजीबापू पाटील-सांगोला ———–

बुलढाणा जिल्हा (2 आमदार)

  1. संजय गायकवाड-बुलढाणा
  2. संजय रायमुलकर-मेहकर ———–

अकोला जिल्हा (1 आमदार)

  1. नितीन देशमुख-बाळापूर ———-

नांदेड जिल्हा (1 आमदार)

  1. बालाजी कल्याणकर-नांदेड उत्तर ———

पालघर जिल्हा (1 आमदार)

  1. श्रीनिवास वनगा-पालघर ——-

नाशिक जिल्हा (1 आमदार)

  1. सुहास कांदे-नांदगाव ———-

अमरावती जिल्हा (2 आमदार)

  1. बच्चू कडू- अचलपूर
  2. राजकुमार पटेल-मेळघाट ————

मुंबई (1 आमदार)

  1. यामिनी जाधव-भायखळा ———

भंडारा जिल्हा (1 आमदार)

  1. नरेंद्र भोंडेकर-भंडारा ———

जळगाव जिल्हा ( 3 आमदार)

  1. किशोर पाटील-पाचोरा
  2. चिमणराव पाटील-पारोळा
  3. लता सोनवणे-चोपडा ————

उस्मानाबाद जिल्हा (2 आमदार)

  1. ज्ञानराज चौगुले-उमरगा
  2. तानाजी सावंत-भूम परांडा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.