शिवसेना आमदार बाळू धानोरकरांचा राजीनामा, लोकसभा अपक्ष लढणार
चंद्रपूर : शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी अखेर अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलाय. धानोरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या जिल्हासंपर्कप्रमुखांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा पाठवलाय. धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत बाळू धानोरकर? बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार […]
चंद्रपूर : शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी अखेर अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलाय. धानोरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या जिल्हासंपर्कप्रमुखांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा पाठवलाय. धानोरकरांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.
कोण आहेत बाळू धानोरकर?
बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असं त्यांचं पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.
युती झाल्यामुळे नाराजी
आमदार बाळू धानोरकर हे भाजपशी पुन्हा युती झाल्याने नाराज होते. शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे अर्थात युती झाल्याने बाळू धानोरकर यांना शिवसेनेकडून चंद्रपुरातून लोकसभा लढवता येणार नाही. त्यामुळे बाळू धानोरकरांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं. काँग्रेसकडून चंद्रपुरात विलास मुत्तेमवारांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बाळू धानोरकर यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.