Breaking | शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची आठ तास ईडीकडून चौकशी, कोणत्या प्रकरणात अडचणीत?

नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचं वृत्त हाती येतंय.

Breaking | शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची आठ तास ईडीकडून चौकशी, कोणत्या प्रकरणात अडचणीत?
ईडी चौकशीनंतर परतताना रविंद्र वायकर
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 8:29 PM

मुंबई : शिवसेना आमदार (Shiv sena MLA) रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची आठ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तास रविंद्र वायकर ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचं वृत्त हाती येतंय.

रविंद्र वायकर

8 तास कसून चौकशी

रविंद्र वायकर हे आज दुपारच्या सुमारास ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल 8 तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. 8 तास शिवसेना आमदार रविंद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांना नेमकं कोणत्याप्रकरणी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुशंगानं ईडीनं रविंद्र वायकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं असल्याचं कळतंय. त्यानुसार रविंद्र वायकर हे चौकशीसाठी हजर झाले होते. आज झालेल्या या चौकशीतून आता नेमकं काय बाबी समोर आल्यात, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चौकशीपूर्वी कमालीची गुप्तता

रविंद्र वायकर हे माजी मंत्री होते. गेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey)  यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्याच्या ईडी चौकशीचं नेमकं कारण काय होतं, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आलंय. मात्र अद्यात या चौकशीबाबात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून कोणत्या प्रकरणी रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते, हे कळू शकलेलं नाही.

इतर राजकीय बातम्या –

जयंत पाटील शेकापच्या पाटलांना चहा देत होते, पण अजितदादांनी थांबवलं! वाचा नेमकं काय घडलं?

चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रपती राजवटीबाबत वक्तव्य, अजित पवार म्हणतात, धन्य आहोत!

मुख्यमंत्र्यांविना पार पडलं सत्ताधाऱ्याचं चहापान, विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशात वातावरण तापणार!

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.