Eknath Shinde : आता उरलेल्या शिवसेना आमदारांना पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणार, शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निर्णय

वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे 27 आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे परत येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आहेत. शिवसैनिकांनो एकत्र रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Eknath Shinde : आता उरलेल्या शिवसेना आमदारांना पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणार, शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निर्णय
आता उरलेल्या शिवसेना आमदारांना पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:16 PM

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड पुकारल्यानंतर शिवसेना सावध झाली आहे. आणखी कोणता दगा फटका होऊ नये म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारां (MLA)ना पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेल (Five Star Hotel)मध्ये ठेवण्यात येणार आहे. वेस्टईन हॉटेल येथे आमदारांना ठेवलं जाणार आहे. सर्व आमदारांना एक एक करुन हॉटेलकडे न्यायला सुरवात झाली असून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे स्वतः हॉटेलमध्ये आमदारांसोबत राहणार आहेत. जोपर्यंत तिढा सुटत नाही, तोपर्यंत आमदारांबरोबर आदित्य ठाकरे असणार आहेत. आदित्य ठाकरे स्वतः आज रात्री हॉटेलमध्ये चर्चा करणार आहेत.

वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे 27 आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे परत येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आहेत. शिवसैनिकांनो एकत्र रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचीही मुंबईत बैठक

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होत आहे. शरद पवार यांचे निवास स्थान सिल्वर ओक येथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मोठे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

हे सुद्धा वाचा

कॉंग्रेस आमदारांचीही बैठक

शिंदेंच्या बंडानंतर काँग्रेसनेही आपल्या आमदारांची बैठक घेतली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित बैठकीला उपस्थित होते. आघाडीवर कितीही संकटं आली तरीही आम्ही तुमच्यासोबत आहेत, असा विश्वास बैठकीनंतर काँग्रेसने शिवसेनेला दिला आहे. बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे म्हटले आहे. (Shiv Sena MLAs will be kept in five star hotel again)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.