नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत उपस्थित केल्यामुळे सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीत धमकावल्याचा आरोप राणा यांनी केलाय. त्यावर अरविंद सावंत यांनी नवनीत राणा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ( Arvind Sawant has denied allegations of threatening MP Navneet Rana)
“नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाहीत. जरी धमकावलं असं त्या म्हणत असतील तर त्या ठिकाणी आजुबाजूला कुणी असतील तर ते सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती बरोबर नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्यांची बोलण्याची पद्धत, शैली ही अतिशय घृणास्पद असते. आजही त्या त्याच पद्धतीने बोलत होत्या”, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.
#WATCH Why will I threaten her? If there were people present near her at that time,then,they can tell if I threatened her. Her way of talking &body language is wrong: Arvind Sawant,Shiv Sena MP on MP Navneet Rana’s allegations against him of threatening her in Parliament premises pic.twitter.com/VwJC6D9UFs
— ANI (@ANI) March 22, 2021
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याच्या आरोपासह अनेक आरोपांचा समावेश आहे.
Maharashtra’s Amravati MP Navneet Ravi Rana writes to Lok Sabha Speaker alleging that Shiv Sena MP Arvind Sena threatened her by saying “Tu Maharashtra mein kaise ghoomti hai main dekhta hun aur tere ko bhi jail mein daalenge,” after she raised Sachin Waze case in the Parliament pic.twitter.com/C09BkD1HrI
— ANI (@ANI) March 22, 2021
महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे प्रकरण, तसंच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडती कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
आज ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते, असं पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :
लोकसभेत नवनीत राणा, गिरीश बापट आक्रमक; ठाकरे सरकारच्या बचावासाठी पंजाबचा खासदार मैदानात