महाराष्ट्रात जे झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं, जावडेकरांची टीका; शिवसेना म्हणाली…

प्रकाश जावडेकर यांचा अशाप्रकारे तोल गेला याचेच मला आश्चर्य वाटते. सहसा ते अशाप्रकारचे वक्तव्य करत नाहीत. | Prakash Javdekar

महाराष्ट्रात जे झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं, जावडेकरांची टीका; शिवसेना म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 3:47 PM

नवी दिल्ली: कृषी कायदे रद्द करण्याची आग्रही मागणी करत ‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आगपाखड केली. महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश जावडेकर यांनी दिला. (Verbal battle between BJP Prakash Javdekar and Shivsena MP Arvind Sawant)

प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले. कृषी कायद्यांबाबत 95 टक्के शेतकऱ्यांना कसलीही समस्या नाही. पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. तो आम्ही लवकर दूर करू. पंजाबमध्ये सरकारकडून सर्वात जास्त धान्य खरेदी झाली. मात्र, तेथील शेतकऱ्यांचा हमीभावाविषयी गैरसमज झाला आहे. अनेकदा गैरसमज दूर करायला वेळ लागतो. पण उद्याच्या बैठकीत सगळे गैरसमज दूर होतील, असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

… मग ती भाजपची गद्दारी नव्हती का; अरविंद सावंतांचा सवाल

प्रकाश जावडेकर यांच्या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कशी कमी होतील, हा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री तेव्हा सिंधुदुर्गात ठाण मांडून बसले होते. ती भाजपची गद्दारी होती की इमानदारी, असा सवाल अरविंद सावंत यांना प्रकाश जावडेकर यांना विचारला.

प्रकाश जावडेकर यांचा अशाप्रकारे तोल गेला याचेच मला आश्चर्य वाटते. सहसा ते अशाप्रकारचे वक्तव्य करत नाहीत, पण ते दुर्दैवाने असं बोललं असतील. शिवसेनेला गद्दारी हा शब्द लागूच पडत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’, अशी शिवसेना आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले.

संबंधित बातम्या:

शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली; शरद पवारांपुढे लीन झालेय: प्रविण दरेकर

‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’

(Verbal battle between BJP Prakash Javdekar and Shivsena MP Arvind Sawant)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.