Sanjay Raut | औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? नामांतर निर्णय स्थगितीवरून संजय राऊतांचा सवाल

एकिकडे हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करतायत आणि दुसरीकडे हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले, त्यांना स्थगिती कशासाठी देतायत? असा सवाल राऊतांनी केला.

Sanjay Raut | औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? नामांतर निर्णय स्थगितीवरून संजय राऊतांचा सवाल
खा. संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 11:17 AM

नागपूरः औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर धाराशिव करण्याच्या निर्णयाला एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती दिल्याचं वृत्त आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला जाब विचारला आहे. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्याामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे सरकारमधील गोंधळाच्या स्थितीसाठी फडणवीसांनाच प्रश्न विचारा, असं संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतर निर्णयाला स्थगिती देण्याच्या वृत्तावर संजय राऊत म्हणाले, ‘मविआने दिलेल्या 5 निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली. ठाकरे सराकरने औरंगाबाद- संभाजीनगर, उस्मानाबाद -धाराशिव केलं. मुंबई आंतरारष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील हे नाव दिलं. पण या सरकारने निर्णय फिरवले. तर हे सरकार हिंदुत्वद्रोही. महाराष्ट्रद्रोही आहे. संभाजीनगर कधी करणार, हा प्रश्न भाजप अनेक वर्षांपासून विचारत होते. दि बा पाटील यांच्या नावासाठीही मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही पर्वा न करता हे निर्णय घेतले. या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली असेल तर असे ढोंगी इतर कुणी नाहीत. सरकार बेकायदेशीर आहे, त्यामुळे हा निर्णयही अवैध आहे.

‘औरंगजेब, उस्मान कोण लागतो तुमचा?’

या निर्णयांना स्थगिती देऊन शिंदे सरकारने नेमकं काय साध्य केलं, असा सवाल विचारल्यावर राऊत म्हणाले, ‘काय साध्य केलंय हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. एकिकडे हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करतायत आणि दुसरीकडे हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले, त्यांना स्थगिती कशासाठी देतायत? राजकीय निर्णय समजू शकतो. आर्थिक विषयही समजू शकतो. पण हे निर्णय कशासाठी घेतले? आता औरंगजेब आता कसाकाय नातेवाईक झाला? उस्मान कोण लागतो तुमचा? दि बा पाटलांसाठी लोकभावनेचा आदर म्हणून निर्णय घेतला होता. हे सरकार गोंधळलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. निर्णय घेताना स्थगिती देताना विवेक हरवला आहे….

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.