VIDEO: ईडीचं वसुलीचं रॅकेट ते सोमय्यांच्या मुलाला निकॉनची पार्टनरशीप; संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केले. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले.

VIDEO: ईडीचं वसुलीचं रॅकेट ते सोमय्यांच्या मुलाला निकॉनची पार्टनरशीप; संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 5:46 PM

मुंबई: गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केले. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले. भाजप नेते किरीट सोमय्या  (kirit somaiya) यांचे नाव घेऊन राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले. तसेच सोमय्या यांची चिरंजीव नील सोमय्या यांना निकॉनमध्ये पार्टनरशीप कशी मिळाली ते ईडीचं (ED) वसुली रॅकेट कसं चालतं इथपर्यंतचा पर्दाफाश राऊतांनी केला. तसेच राकेश वाधवानला पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुनही जमीन घेतली. हे सगळं संशयास्पद आहे. वाधवानच्या एडीआयएलचा घेऊन इतके गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्यासोबत असे व्यवहार कसे काय करु शकते? असा सवाल करतानाच बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. किती कागद फडफडवा, असा दावाही राऊत यांनी केला. राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे वाचा सविस्तर.

  1. जुन-जुलै 2015मध्ये सोमय्यांनी एचडीआयएल आणि जीव्हेकेवर मुंबईची 63 एकर जमीन हडपण्याचा आरोप केला. त्यांनी एमएमआरडीएमध्ये (mmrda) सातत्याने तक्रारी केल्या. त्यांची ती सवय आहे. ते सीरियल कंम्प्लेनर आहेत. सीरियल किलर असतो, सीरियल रेपिस्ट असतो तसा तो सीरियल कंम्पलेनर आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. ऑक्टोबर 2015मध्ये सोमय्याने एमएमआरडीएवर आरोप लावला की एचडीआयएलला एक कोटी स्क्वेअरफूट कमर्शियल जमीन गिफ्ट दिली. त्याची मार्केट व्हॅल्यू 5 हजार कोटी आहे. त्यामुळे घोटाळ्याची स्पेशल चौकशी झाली पाहिजे. दोन्ही कंपन्यांना ब्लॅकमेल केलं पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. एक वर्ष त्यांनी सातत्याने एमएमआरडीएकडे तक्रार केली. चौकशीची मागणी केली होती. सोमय्यांनी त्यांच्या कोणत्याच पत्रकात कधीच पोलीस किंवा केंद्र सरकारकडे या प्रकरणाची त्यांनी तक्रार दिली नसल्याचं उघड झालं आहे. त्यावेळी ते खासदार होते. ते लोकसभेत मुद्दा उचलू शकत होते. पण त्यांनी लोकसभेतही हा मुद्दा उचलला नाही. उलट 2016मध्ये त्यांनी एमएमआरडीएला तक्रार करणं बंद केलं. 1 डिसेंबर 2016मध्ये सोमय्याचा मुलगा नील सोमय्याला निकॉन इन्फ्रामध्ये पार्टनर बनवलं गेलं. त्यानंतर तक्रारीही बंद झाल्या. 27 जुलै रोजी निकॉनने 5 हजार स्क्वेअर मीटरच्या जमिनीच्या विकासाचे हक्क मिळवले.
  2. जितेंद्र चंद्रलाल नवलानी असे या व्यक्तीचे संपूर्ण नाव राऊतांनी सांगितलं आहे. यात 60 कंपन्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे वसुल केलेत. या कॅश आणि चेक पेमेंटही आहे. डिजीटल ट्रान्सफरही आहे. ज्या कंपन्याची ईडीनं चौकशी केली. त्या कंपन्यांनी ईडीचा पैसा ट्रान्सफर केला. हा नवलानी ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसाठी काम करतो. 2017 मध्ये ईडीनं दिवाणा हाऊंसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. जितेंद्र नवलानीला 25 कोटी ट्रान्सफर झाले..मग 31 मार्च 2022 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून 10 कोटी ट्रान्सफर केले नवलानीला, नवलानीच्या सात कंपन्यांनी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले.15 कोटी रुपये अशाच एका चौकशी सुरु असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. अनसिक्युअर्ट ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही, तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश चैक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकारीच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन. नवलानी कोणंय..? सौमय्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे.
  3. तर ईडीचे मोठे अधिकारी या नवलानीसोबत कसे जोडले गेले आहेत. पब्लिक सेक्टर बँकेचं लोन न देणारे लोक नवलानीला कसले पैसे देतात, तर कसली कन्सलटन्सी देतात, हा सगळा पैसे दिल्ली आणि मुंबईत बसलेल्या ईडी ऑफिसरला दिला जातोय, परदेशात या पैशांनी बाहेर जमीन खरेदी केली जाते आहे. आणि आता आमच्या लोकांचे एक दोन तीन लाखाचे व्यवहार पाहत आहेत. तुमचं ट्रान्सझॅक्शन कोण पाहणार आहे. हे मी हवेत बोलत नाहीय.. कागद दिलंय. देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं हे सगळ्यात मोठं रॅकेट आहे. मविआच्या लोकांना चुचकारण्याचं काम जे होतंय. हेही याच रॅकेटचा भाग आहे. ही फक्त 10 टक्के गोष्ट आहे. याबाबत एक अहवालही समोर आला आहे. विजिलन्स रिपोर्ट समोर आला आहे. तोही मी पीएमला पाठवलाय.
  4. 15 फेब्रुवारीला ईडी अधिकाऱ्याबद्दल बोललो होतो. अनेक नेते आहेत भाजपचे यात, सोमय्या तर गेस्ट आर्टिस्ट आहेत. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचं तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. जो ईडीचा अधिकारी होती ज्यानं निवडणूक लढवली, त्यानं पन्नास जणांचं खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशिन बनलीये. मी अतिशय जबाबदारीनं हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतली सगळा कच्चाचिट्ठा पीएम कार्यालयाला दिलाय. तुम्ही स्वच्छ भारत अभियान हे काही फक्त कचरा साफ करण्यासाठी नाहीये, तर भ्रष्टाचारही साफ करायचाय. मी पत्र लिहिलंय. ईडीला जे तुम्ही कामाला लावलंय. जे तुमचे राजकीय विरोधक आहेत. भाजपविरोधात दहा भाग पीएम कार्यालयाला देणारा. भाग भागात देणार. मागच्या काही वर्षांपासून ईडीचे काही अधिकारी आणि एजंट त्यांचं एक नेटवर्क बिल्डर डेव्हलपर आणि कॉर्पोरेटला धमकावण्याचं काम करतंय. ईडीकडून या सगळ्यांकडून वसुली केली जातेय. या सगळ्यांचे डॉक्युमेन्ट्साही दिलेत.
  5. मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत.
  6. माझे शब्द लिहून ठेवा. या प्रकरणात ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाऊ शकतात. ही चोरी, लफंगेगिरी आहे. कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातायत? हा पैसा पीएम केअर फंडमध्ये जातोय का, असा सवाल त्यांनी केला. हा सारा पैसा विदेशात जातोय. त्या मागे खूप मोठे रॅकेट आहे. यामध्ये भाजपचे नेतेही सहभागी आहेत. तुम्हाला याची माहिती देतोय. हे हवेत बोलत नाही. पुढच्या पत्रकार परिषदेत त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. काही जण कागदांवर बोलताना ना. आम्हीही ईडीला कागद दिलाय, पण त्याकडे तर कुणी पाहिलं नाही. आता मुंबई पोलीस अख्ख्या विश्वात बेस्ट आहे. तेच याची चौकशी करतील.
  7. मुंबईत आज बऱ्याच घडामोडी घडत आहेत. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यामुळे तुम्हालाही खूप काम आहे. इथून तिथे तिथून इथे. आम्ही ठरवलं आपणही रेड टाकावी. आम्हाला घुसायचा अधिकार आहे. आमच्या घरात कुणी घुसत असेल तर मुंबईत शिवसेनेलाही घुसायचा आणि घुसवायचा अधिकार आहे. मी सकाळापासून पाहत आहे. आज काही कार्यकर्त्यांवर आयकरच्या धाडी पडत आहेत. काही भानामती सुरू आहेत. आता आयटीच्या भानामती सुरू आहे. जोपर्यंत बीएमसीच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत प्रत्येक वॉर्डात धाडी पडतील. आता जिथे जिथे सेनेचे कार्यकर्ते आहेत, निवडणूक लढत आहेत, शाखा आहेत तिथे धाडी टाकाव्यात, एवढंच काम ईडीला राहिलं आहे.
  8. केवळ महाराष्ट्र आणि बंगालमध्येच सिलेक्ट लोकांनाच टार्गेट का केलं जात आहे हा सवाल आहे. या देशात इतर राज्यात कोणी मिळत नाही का? केवळ शिवसेना आणि तृणमूलच मिळत आहे का? हे सरकार पाडण्याचं षडयंत्र आहे. शिवसेनेच्या आघाडीच्या सरकारला दबावात आणून त्यांना अस्थिर करण्याचं हे मोठं षडयंत्रं आहे.
  9. आयकर आणि ईडीला मी पुराव्यासह 50 नावं पाठवली आहेत. मी वारंवार उल्लेखही केला आहे. पण ईडी आणि आयकरला एक जबाबदार खासदार काही बोलत असेल तर त्यावर चौकशी झाली पाहिजे असं त्यांना वाटत नाही. आमच्याबाबतीत हे बोगस ते बोगस असं म्हटलं. किरीट सोमय्याने एका केंद्रीय मंत्र्यांबाबत बोगस कंपन्यांची लिस्ट दिली काहीच झालं नाही. कोणी ढवंगाळे यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी स्वत: पाठवली. काय झालं त्याच? संपूर्ण देशात सर्वाधिक ईडीची चौकशी, कारवाई केवळ महाराष्ट्रात झाली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली आहे. पश्चिम बंगालमधील 7 लोकांवर कारवाई झाली आहे. भाजपच्या नेत्यांवर कोणतीही कारवाई नाही. ते काय हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे का. ही भानामाती काय आहे त्याचा शिवसेना लवकरच खुलासा कणार आहे.
  10. सुमित कुमार नरवरच्या नावाचा मागे मी उल्लेख केला होता. बुलंद शहरातील या दूध विकणाऱ्या सामान्य माणसाची प्रॉपर्टी चार पाच वर्षात आठ हजार कोटी झाली आहे. आता मलबार हिलमध्ये तो राहतो. पूर्वी तो नोएडात राहत होता. त्याला राहायला घरही नव्हतं. ईडीने कोणता चष्मा लावला आहे. जरा आमच्याकडेही त्या चष्म्यातून पाहा. मी त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे देतो. दिल्ली महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा पैसा त्याच्याकडे आहे ही माहिती देईल. त्याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. पैसा कुणाचा आहे, ट्रायडन्ट कुणाचा आहे? पाच वर्षापूर्वी त्यांना कामं मिळत होती. माझ्याकडे सर्व माहिती आहे. ही भानामती सांगणार. त्यानंतर तुम्ही आमच्यावर रेडही टाकाल. आम्हाला अटक कराल. करा.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut Press Conference LIVE : आज राऊतांचं टार्गेट काय? शिवसेना भवनावरून दुसरी पत्रकार परिषद

सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या महाराष्ट्र, दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट

माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार, संजय राऊतांची मोठी घोषणा, मुंबई पोलिसांची चौकशी सुरू

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.