राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Sanjay Raut Governor Bhagat Singh Koshyari meet) यांची भेट घेतली.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Sanjay Raut Governor Bhagat Singh Koshyari meet) यांची भेट घेतली. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती. “राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप दिवस व्यक्तीशा भेटलो नव्हतो, बऱ्याच दिवसापासून भेट राहिली होती, त्यामुळे सदिच्छा भेट घेतली, असं संजय राऊत यांनी या भेटीनंतर सांगितलं. (Sanjay Raut Governor Bhagat Singh Koshyari meet)
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, एखाद्या पिता-पुत्राने त्यांचे संबंधत आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.
“राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना मी व्यक्तिश: भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती. यापलिकडे काही नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध जसे पित-पुत्राचे असावेत तसेच आहेत, तसेच रहावेत दऱ्या वगैरे आमच्यात पडत नाही.”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आणि माझे जुने संबंध आहेत, राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे. सरकार कोणत्या उपाययोजना राबवत आहे याची कल्पना राज्यपालांना आहे, असं राऊत म्हणाले.
विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तृतीय वर्षाची परीक्षाही रद्द करण्याची विनंती केली होती, त्यावर राज्यपालांनी नाराजी व्यक्त करत ही परीक्षा घेण्याचं नियोजन करा असे आदेश दिले होते.
त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, ते म्हणाले, “उदय सामंत यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं, राज्यपाल हे कुलपती आहेत, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, त्याबाबत सरकार आणि संबंधित मंत्री निर्णय घेतील”
संजय राऊत काय म्हणाले?
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, पिता-पुत्राने आहेत, तसेच राहावेत, दऱ्या वगैरे आमच्यात काही पडत नाहीत
उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, राज्यपाल हे कुलपती आहेत, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, त्याबाबत सरकार-संबंधित मंत्री निर्णय घेतील
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे-माझे जुने संबंध, राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे
विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जाऊन थेट बातचीत करायला हवी
राज्यपाल हे घटनात्मक पद, ते या राज्याचे पालक, ते प्रियच असतात – संजय राऊत
संबंधित बातम्या
राज्यपालांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, अधिकाऱ्यांसह मिलिंद नार्वेकरांची हजेरी