Rajya Sabha Election Results 2022: कोण आहेत ते सहा आमदार ज्यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा गेम केल्याचा राऊतांचा आरोप आहे!

महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांवर संताप व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, ' जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली अस्ं वाटतं मला.

Rajya Sabha Election Results 2022: कोण आहेत ते सहा आमदार ज्यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा गेम केल्याचा राऊतांचा आरोप आहे!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 2:03 PM

मुंबईः दिल्लीची ताकद वापरून महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासल्याची टीका भाजपवर करत असताना शिवसेनेने दगाबाजांनाही पाहून घेईल अशी भाषा केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) गेम करणाऱ्यांची नावं उघड केली. या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. राज्यसभेच्या या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजप विरोधात शिवसेना अशी चुरस होती. मतमोजणीसाठी झालेला विलंब आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतमोजणी झाल्यानंतर भाजपचे धनंजय महाडिक (Dhanajay Mahadik) विजयी झाले. तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 मतं मिळाली होती तर धनंजय महाडिक यांना 27 मतं मिळाली होती. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला.

संजय राऊतांनी घेतलेली सहा नावं कोणती?

  1. संजय मामा शिंदे- अपक्ष आमदा-कोल्हापूर
  2. श्याम सुंदर शिंदे- अपक्ष आमदार- नांदेड
  3. देवेंद्र भुयार- अपक्ष आमदार – अमरावती
  4. हितेंद्र ठाकूर- बहुजन विकास आघाडी
  5. क्षितिज ठाकूर- बहुजन विकास आघाडी
  6. राजेश पाटील- बहुजन विकास आघाडी

‘केंद्राच्या मदतीनं निवडणूक जिंकली’

केद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजपनं निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपनं केला. ते म्हणाले, ‘ ज्या कारणासाठी माझं एक मत बाद केलं. अशाच प्रकारचा काही मतांवर आक्षेप आम्ही ही घेतला होता. त्याचप्रकारची चूक समोरच्यांनी केली. पण त्यांची मते बाद झाली नाही. निवडणूक आयोगाने समोरच्यांची मते बाद केली नाही. त्यात सात तास गेले. मत शोधण्यासाठी. कुणाला पडणारं मत बाद झालं. केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कशा काम करतात हे आम्ही डोळ्यांनी पाहतो. कुठे ईडी वापरलं जातं, कुठे सीबीआय वापरलं जातं. कुठे अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात का हा प्रश्न आहे…’

हे सुद्धा वाचा

‘बाजारातले घोडे विकले गेले’

महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांवर संताप व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, ‘ जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली अस्ं वाटतं मला. किंवा इतर काही कारणं असेल. त्यामुळे आमची अपक्षांची सहा मते आम्हाला मिळाली नाही. ते कुणाचेच नसतात. असे लोक कुणाचेच नसतात. पण जे घटक पक्ष आहेत. आमचे लोक आहेत. छोटे पक्ष आहेत जे शिवसेना किंवा आघाडीबरोबर आहेत. त्यांचं एकही मत फुटलं नाही. सेना काँग्रेस राष्ट्रवादी बच्चू कडू गडाख यड्रावकर इतर काही मतांविषयी आम्ही चर्चा केली होती. ती सर्व मते आम्हलाा मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जे उभे होते त्यांचे सहा सात मते पडली नाही. आम्ही णत्याही व्यवहारात पडलो नाही. व्यापार केला नाही.’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.