‘कुणाला तरी कुर्बान व्हावं लागेलच, एकेका अधिकाऱ्याला एक्सपोज करेन’ संजय राऊत यांचा थेट इशारा

समन्स, ईडीची पथकं ही फक्त महाविकास आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू यादव यांच्यापुरतेच मर्यादित आहेत, की त्यांच्यासाठीच या केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे, हे पाहू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

'कुणाला तरी कुर्बान व्हावं लागेलच, एकेका अधिकाऱ्याला एक्सपोज करेन' संजय राऊत यांचा थेट इशारा
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:36 AM

मुंबईः महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Navab Malik) यांची आज सकाळपासूनच ईडीने चौकशी सुरु केली आहे. मलिक यांच्या घरी ईडीचे आज सकाळी 23 फेब्रुवारी रोजी ईडीचे (ED Enquiry) लोक आले आणि त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि केंद्र सरकारविरोधात सातत्याने आगपाखड केल्यानेच नवाब मलिक यांच्या पाठीशी आता ईडी लागली आहे, असा आरोप केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील याविषयी प्रतिक्रिया दिली. केंद्रीय तपास यंत्रणा या केवळ महाविकास आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांसाठीच बनलेल्या आहेत का? असा सवाल यांनी केला. या सगळ्याचा मी जाब विचारणार असून देशासाठी हौतात्म्य आलं तरी चालेल, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी दिला.

काय म्हणाले संजय राऊत?

केंद्रीय तपास यंत्रणांची एक ना एक दिवस पोलखोल करणार, असा इशारा देताना संजय राऊत म्हणाले, ‘ 23 हजार कोटींचा शिपयार्ड कंपनीचा बँक घोटाळा आहे. इतके वर्ष त्याला कोण संरक्षण देत होतं, आताही ऋषी अग्रवाल यांना वाचवण्यासाठी पहाडाप्रमाणे कोण उभं आहे? कुठली तरी एक शक्ती आहे सरकारमधली. ती कोण आहेत? कोणत्या तपास यंत्रणा आहेत, काय आहे? हे सगळं समोर येणार आणि याच्या परिणामांची पर्वा मी करत नाही. देशाच्या हिताची गोष्ट आहे, ती आम्ही करतो. शेवटी राष्ट्राच्या हितासाठी हौतात्म्य पत्करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल. स्वातंत्र्यासाठी, लोकशाही साठी. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे भ्रष्ट आणि वाळवीनं पोखरलेल्या आहेत. कशाप्रकारे त्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली, विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न करतायत, हे सगळं एकदा समोर येईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा- संजय राऊत

संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा अशी उपाधी दिली. ते म्हणाले, ‘ किरीट सोमय्या यांनी भाजपच्या नेत्यांचीच काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत. आज जे भाजपचे मंत्री आहेत, पदावर आहेत. त्यांची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा ही पदवी चांगली आहे. कारण मी काहीही बोललं तरी त्यांना वाटतं मी शिवी दिली. हे जे महात्मा आहेत, त्यांनी ईडीकडे अनेक प्रकरणं दिली आहेत. त्यांच्याकडे समन्स का गेलं नाही, त्यांच्या घरी ईडी का गेली नाही? आता ही सगळी प्रकरणं आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची, हे आम्हाला माहिती आहेत. यापूर्वीच्या तक्रारीचं काय झालं हेही विचारणार आहोत? समन्स, ईडीची पथकं ही फक्त महाविकास आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू यादव यांच्यापुरतेच मर्यादित आहेत, की त्यांच्यासाठीच या केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे, हे पाहू.

2024 पर्यंतच हे सगळं चालेल- राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, ‘ 2024 पर्यंत हे सगळं चालेल. त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत. जे भाजप विरोधक आहेत, जे सत्य बोलतायत, त्यांच्याच मागे हे लागतं. पण आम्ही घाबरत नाहीत. ही लढाई चालू राहिल. त्यांना येऊ द्या. तपास करू द्या. कितीही खोटं करू द्या, बनावट करू द्या. शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो. आणि प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. आत्ताच मुख्यमंत्र्यांशी माझं अनेक विषयांवर बोलणार आहे, अशा इशारा संजय राऊत यांनी दिला.

इतर बातम्या-

अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर नियमांचा भंग, मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई

यूजर्स ट्विटर थ्रेड्सवरून स्वतःला अनटॅग करू शकतील, नवीन फीचर लवकरच, जाणून घ्या अधिक!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.