शिवसेनेची रणरागिणी काळाच्या पडद्याआड, नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते (Shiv Sena Nashik Satyabhama Gadekar)

शिवसेनेची रणरागिणी काळाच्या पडद्याआड, नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन
शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 7:29 AM

नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर (Satyabhama Laxman Gadekar) यांचं निधन झालं. कोरोनावरील उपचारादरम्यान गाडेकर यांची प्राणज्योत मालवली. गाडेकर यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली आहे. (Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar Dies of COVID)

सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यभामा गाडेकर कोरोना काळातही जनतेसाठी झोकून देऊन काम करत होत्या. जनसेवा करतानाच अखेर गाडेकरांनाही कोरोनाने गाठले. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.

कोण होत्या सत्यभामा गाडेकर?

सत्यभामा गाडेकर यांनी नाशिक महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे. या नाशिक प्रभाग क्रमांक ’22 ब’ चे प्रतिनिधित्व करत होत्या.  नाशिक महापालिका स्थायी समितीच्याही त्या सदस्या होत्या. गाडेकर शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख होत्या. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर

महिन्याभरात दोन सेना नगरसेविकांचे निधन

अवघ्या महिन्याभरापूर्वीच शिवसेनेच्या नाशिकमधील नगरसेविका कल्पना पांडे यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते. कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे महिन्याभराच्या आत नाशिक शिवसेनेसाठी हा मोठा हादरा आहे.

नांदेडच्या मनसे जिल्हाप्रमुखाचे निधन

मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे गेल्याच महिन्यात अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबादमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळ कौडगे यांनी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता.

संबंधित बातम्या :

बाळासाहेबांचा वाघ ते राज ठाकरेंचा विश्वासू, मनसे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

शिवसेनेच्या रणरागिणीला कोरोनाने गाठलं, नाशिकच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन

(Shiv Sena Nashik Corporator Satyabhama Laxman Gadekar Dies of COVID)

साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.
India's Got Latent Show वादाच्या भोवऱ्यात, सायबर विभागानं थेट सांगितलं
India's Got Latent Show वादाच्या भोवऱ्यात, सायबर विभागानं थेट सांगितलं.
सावंतांवर गुन्हा दाखल होणार?पोरगा लँड पण टेकऑफ झालेला वाद जमिनीवर नाही
सावंतांवर गुन्हा दाखल होणार?पोरगा लँड पण टेकऑफ झालेला वाद जमिनीवर नाही.