कालिदास कोळंबकरांना शिवबंधनांची ऑफर होती, मुनगंटीवर यांचा गौप्यस्फोट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी अगदी अनोख्या पद्धतीने केले.

कालिदास कोळंबकरांना शिवबंधनांची ऑफर होती, मुनगंटीवर यांचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 31, 2019 | 12:43 PM

मुंबई : भाजपमध्ये आज (31 जुलै) मेगाभरती पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड (Madhukar Pichad), त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) , मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यासह अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी अगदी अनोख्या पद्धतीने केले. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सुरुवातीला पक्षात स्वागत केले. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे त्यांच्या वंशज साताऱ्यात शिवेंद्रराजे पक्षात येतात. “छत्रपतींचे रयतेचे राज्याचे स्वप्न घेऊन ते पूर्ण करताना त्यांच्या पक्ष प्रवेशाने आणखी जास्त योगदान आणि गती मिळणार आहे असे त्यांनी शिवेंद्रराजेंना स्वागत करताना म्हटले.”

तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड यांनीही पक्षात प्रवेश केला. यांचे स्वागत करताना नगर जिल्ह्यात सबका मालिक एक ही शिर्डी आहे. त्या जिल्ह्यात रामही आहे आणि राधाकृष्णही आहे आणि त्याच जिल्ह्याचे वैभव वाढवण्यासाठी वैभव पिचडही या पक्षात येत आहेत. तसेच आमच्या सर्वांचे आदर्श आणि आदरणीय मधूकर पिछड या सज्जन माणसाने पक्षात प्रवेश केला. या दोन्ही पिता-पुत्रांचे स्वागत असेही ते म्हणाले.

त्याशिवाय नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक हे उत्तम कार्यकर्ते आहेत. तसेच संयमी नेतेही आहेत. विशेष म्हणजे ते अतिशय चांगल्या पद्धतीने नवी मुंबईचे नेतृत्व करतात.

कालिदास कोळंबकर गेल्या 30 वर्षापासून विधानसभेचे नेतृत्व करतात. मला नेहमी येऊन भेटायचे आणि पक्ष प्रवेशाचे काय झाले असे विचारायचे. त्याचे कारणही म्हणजे इतर पक्ष सुद्धा आग्रह करत होते. तुम्ही आमच्या पक्षात या हे बंधन बांधा ते बंधन बांधा अशा ऑफर त्यांना येत होत्या. म्हणून ते पक्षप्रवेशासाठी फार आग्रही होते. पण मी त्यांना सांगायचो तुम्ही याच पक्षात फीट आहात. असाही गौप्यस्फोट मुनगंटीवारांनी केला.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचेही मुनगंटीवारांनी अनोख्या पद्धतीने स्वागत केले. “अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला. गेल्या 5 वर्षातील महाराष्ट्रातील वाघांची सख्या 190 वरुन 312 झाली आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढते. त्यात आणखी एक वाढ झाली ती म्हणजे चित्रा वाघ यांची, त्यामुळे आता वाघांची संख्या 313 झाली आहे. त्यामुळे आता काही पक्षांचे तीन तेरा वाजवण्याचं काम त्या करतील अशी मला अपेक्षा आहे.”

संबंधित बातम्या : 

आधी सुजयला पकडलं, राधाकृष्ण सापडले, वैभवला पकडलं मधुकर पिचड मिळाले, मुख्यमंत्र्यांनी रणनीती सांगितली!

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.