Shiv sena : शिवसेनेतून हकालपट्टीचं सत्र सुरुच! आता रवींद्र फाटक आणि राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी

Ravindra Phatak News : शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या पाहता उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत.

Shiv sena : शिवसेनेतून हकालपट्टीचं सत्र सुरुच! आता रवींद्र फाटक आणि राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी
हकालपट्टीचं सत्र..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 7:31 AM

मुंबई : शिवसेनेतून (Shiv sena News) बंडखोरांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरुच आहे. सोमवारी संतोष बांगर (Santosh Bangar News) याची हकालपट्टी केल्यानंतर आता मंगळवारी रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे. रवींद्र फाटक यांच्यासोबत राजेश शहा यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता हळूहळू कारवाईचा बडगा उगारताना दिसत आहेत. शिवसेनेतून बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या मुखपत्रातून हकालपट्टीच्या कारवाईबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

दरम्यान, आता स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वातही बदल करण्यात आले आहेत. शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या पाहता उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत. शिवसेना भवनात आता बैठकांचा जोर वाढला आहे. खासदार, जिल्हा प्रमुख आणि स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका उद्धव ठाकरेंनी घेतल्या. त्यानंतर स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वात बदल करण्यात आले आहेत. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांकरता शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

कुणाकुणाची निवड?

  1. महिला जिल्हा संपर्क संघटक – अनिता बिर्जे (ठाणे व पालघर जिल्हा)
  2. ठाणे जिल्हा महिला जिल्हा – संघटक – समिधा मोहिते (विधानसभा ठाणे, ओवळा-माजीवडा)
  3. रेखा खोपकर (विधानसभा कोपरी – पाचपाखाडी, मुंब्रा – कळवा)
  4. महिला उपजिल्हा संघटक – महेश्वरी तरे, संपदा पांचाळ, अॅड. आकांक्षा राणे
  5. महिला शहर संघटक – स्मिता इंदुलकर (ठाणे विधानसभा)
  6. वासंती राऊत (ओवळा माजीवडा विधानसभा)
  7. प्रमिला भांगे (कोपरी-पाचपाखाडी विधानसभा)
  8. महिला उपशहर संघटक- मंजिरी ढमाले (ठाणे शहर)
  9. कुंदा दळवी (ठाणे शहर विधानसभा)
  10. महिला विधानसभा क्षेत्र संघटक- शीतल हुंडारे (मिंढे) (ओवळा – माजीवडा विधानसभा)
  11. महिला विभाग संघटक – संपदा उरणकर ( खोपट, विकास कॉम्प्लेक्स आणि परिसर)
  12. नंदा कोथले (गोकुळनगर, आझादनगर)
  13. महिला उपविभाग संघटक – राजश्री सुर्वे (खोपट विभाग)

ठाकरेंकडून सतर्कता

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणेमध्ये उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसात महत्त्वाचे बदल केले आहेत. स्थानिक पातळीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाणे आणि आसपासच्या पालिकांमधील नगरसेवकांनीही शिंदे गटाला समर्थन दिलं होतं. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक पालिकेतील शिवसेना नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांचा विचार करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे बदल करण्याचा धडाका लावला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.