Uddhav Thackeray : माझ्या मुलांना आयुष्यातून उठवेपर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात! उद्धव ठाकरेंनी सुनावलं

Uddhav Thackeray LIVE Maharashtra News : प्रेम खरं आहे की खोटं आहे. हेही जनतेला कळू द्या, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना डिवचलंय.

Uddhav Thackeray : माझ्या मुलांना आयुष्यातून उठवेपर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात! उद्धव ठाकरेंनी सुनावलं
लढाईसाठी तयार राहा, उद्धव ठाकरेंचे आदेश Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 2:44 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) यांनी पत्रकार परिषदेतून बंडखोर शिवेसना आमदारांना (Rebel Shiv Sena MLA) थेट प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना सुनावलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आदित्य ठाकरेंवर भाजपने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. तसंच बंडखोर आमदारांना थेट समोरा समोर येऊन बोलण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केली. तसंच मातोश्रीवर (Matoshree News) सन्मानानो बोलावलं, तर येऊ असं बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत आम्हाला आदर आहे, अशीही भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली होती. या भूमिकेवरच उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेत.

उद्ध ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मातोश्रीवर सन्मानाने बोलावलं, असे बोलणाऱ्यांना मातोश्री, आदित्य, उद्धव यांच्याबाबत प्रेम आहे, याबद्दल धन्यवाद, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण हे जे प्रेम दाखवता, तेच प्रेम दोन अडीच वर्ष कुठे होतं, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. याच घरावर जेव्हा अश्लाघ्य टीका केली जात होती, तेव्हा त्यांच्याविरोधात दातखिळ बसली होती का? विकृत शब्दांत ज्यांनी आमच्यावर टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. हे प्रेम खरं आहे की खोटं आहे. हेही जनतेला कळू द्या, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना डिवचलंय. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांचे प्रयत्न चालले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली.

नारायण राणेंनी केली होती टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणेंनी केलेले सनसनाटी आरोप तेव्हा प्रचंड चर्चेत आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर बंडखोर आमदारांपैकी कुणी बोललं होतं का, असा सवालच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलाय. दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणावरुनही आदित्य ठाकरेंवर नारायण राणेंनी टीका केली होती. हा वाद प्रचंड चर्चेत आला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

‘शिवसेनाच कुणाची? आमचीच’

दरम्यान, यावेळी शिवसेना ही आपलीच असल्याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरेंनी केली. साध्या साध्या माणसांना शिवसेनेनं मोठं केलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसंच अडीच वर्षांपूर्वी हे सगळं झालं असतं, तर ते सन्मानाने झालं असतं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.