Pratap Sarnaik : शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात !, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज 14 जुलै रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत.

Pratap Sarnaik : शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवक शिंदे गटात !, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
शिवसेनेचे मीरा भाईंदरमधील १८ नगरसेवक शिंदे गटात !Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:33 PM

मुंबई मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे (Shivsena)  18 विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज 14 जुलै रोजी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत. मीरा भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात व पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेचे विद्यमान 18 शिवसेना नगरसेवक , तसेच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सत्कार करणार आहेत व शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत.

आमदार प्रताप सरनाईकांनी जवळच्या लोकांना शिंदे गटात नेले

महाविकास आघाडीसोबत आमचं जमत नसल्यामुळे आम्ही बाहेर पडत आहोत असं कारण सांगून शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केल. सुरुवातीला त्यांनी गुजरातमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर तिथं सुरक्षा कमी वाटू लागल्यानंतर आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील एक पंचतारांकित हॉटेल गाठलं. गुवाहाटीत गेल्यानंतर अनेक आमदारांनी गुवाहाटी गाठली आपलं समर्थन शिंदे गटाला दिलं. तेव्हापासून शिंदे गटात अनेकजण जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते म्हणजे आमदार प्रताप सरनाईक हे स्वत: शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सोबत असणारे अनेक आमदार घेऊन गेल्याची चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

शिवसेना वाढवण्यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं काम केलं

मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेतील 18 विद्यमान नगरसेवक आज शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ते एकनाथ शिंदे यांच्या गटात ते सामील होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेची नवीन कार्यकारिणी सुद्धा आज शिंदे गटात सामील होणार आहे.  मीरा भाईंदर शहरात मागील अनेक वर्षात शिवसेना वाढवण्यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं काम केलं आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,  संजय राऊत यांना मिरा भाईंदर महापालिकेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार अशी चिन्हं दिसत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.