Maharashtra politics : शिवसेनेच्या याचिकेवर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड हाती येते आहे. राजकीय पेच असलेली याचिका अखेर कोर्टात (Supreme Court) लिस्ट झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी सुनावणी होणार हे स्पष्ट झालं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड हाती येते आहे. राजकीय पेच असलेली याचिका अखेर कोर्टात लिस्ट झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज याप्रकरणी सुनावणी होणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना (shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आमदारांचं निलंबन, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव यासह अनेक राजकीय गुंतागुंतीच्या जटील प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. याआधी 11 जुलैची म्हणजेच आजची तारीख देण्यात आली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात लिस्ट न झाल्यानं आज सुनावणी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आता राजकीय पेचाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या याच निर्णयावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र ज्या आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. जे आमदार पक्षादेश असताना देखील बैठकांना उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा मागणीची याचिका शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सर्व नियमाला धरूनच झाल्यामुळे निलंबनाचा प्रश्न येत नसल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच न्यायालयात आमचाच विजय होईल अशा विश्वास देखील शिंदे गटाने व्यक्त केला आहे.
कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
दरम्यान या प्रकरणात शिवसेनेने जी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीसाठी न्यायालयाने 11 जुलै म्हणजे आजची तारीख दिली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात लिस्ट न झाल्यानं आज सुनावणी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आता हे प्रकरण कोर्टात लिस्ट झाल्याने त्यावर आजच सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. कारण याच निर्णयावर नव्या सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज तरी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलासा मिळणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.