ShivSena:शिवसेना अजूनही एनडीएतच, एकनाथ शिंदे समर्थक खासदारांचा दावा, शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नसल्याचा दावा

संसदेमधील गटनेता केवळ बदलला जाणार आहे, त्या जागी राहुल शेवाळे हे नवे गटनेते असतील. पक्षप्रतोदी भावना गवळी कायम राहणार आहेत. शिंदे गटातील खासदारांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ShivSena:शिवसेना अजूनही एनडीएतच, एकनाथ शिंदे समर्थक खासदारांचा दावा, शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नसल्याचा दावा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:52 PM

नवी दिल्ली : शिवसेना(Shiv Sena) अजूनही एनडीए मध्येच आहे, असा पवित्रा एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना समर्थन करणाऱ्या शिवसेना खासदारांनी घेतला आहे. एनडीएच्या( NDA) सभासदत्वाचा राजीनामा शिवसेनेने दिलेला नाही, असा त्यांचा युक्तिवाद असणार आहे. अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रीपद सोडलं, शिवसेना यूपीएचा घटक नाही, असा शिंदे गटातील खासदारांचा दावा आहे. शिंदे गटाच्या आजच्या खासदारांच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. संसदेमधील गटनेता केवळ बदलला जाणार आहे, त्या जागी राहुल शेवाळे हे नवे गटनेते असतील. पक्षप्रतोदी भावना गवळी कायम राहणार आहेत. शिंदे गटातील खासदारांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवसेना एनडीएचाच घटक पक्ष असल्याचा दावा

२०१९ च्या लोकसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपाने एकत्र लढवलेल्या होत्या. त्यात एनडीए म्हणून सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मंत्रपद आले होते. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलीही होती. मात्र नंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर अरविंद सावंतांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले होते. त्यानंतर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतल्याचे सांगण्यात आले होते. आता शिंदे यांच्या गटातील १२ खासदारांनी आता एनडीएतून शिवसेना बाहेरच पडली नसल्याचा दावा केला आहे.

हा केवळ शिवसेना किंवा महाराष्ट्राचा प्रश्न नाही. संविधानावरच हल्ला होत आहे. संविधानावर हल्ला होत आहे त्यावर का बोलत नाही. अरुणाचल प्रदेशात काय झालं होतं. अरुणाचलने २२ आमदार फोडले होते. तेव्हा कोर्टाने फुटिरतावाद्यांच्या विरोधात निर्णय घेतला आहे असे अरविंद सावंत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या सांगण्यावरून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. त्यानंतरही खासदार वेगळी वाट धरण्याच्या मार्गावर असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.