Shvsena Vs Shinde | आमदारांवर पक्षविरोधी कारवाई व्हावी, कारण हे 3 दिवस, कपिल सिब्बलांचा युक्तीवाद काय?

शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण घटनेचा वाद कधी सुरु झाला आणि हे तीन दिवस का महत्त्वाचे आहेत, हे सांगितलं.

Shvsena Vs Shinde | आमदारांवर पक्षविरोधी कारवाई व्हावी, कारण हे 3 दिवस, कपिल सिब्बलांचा युक्तीवाद काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 11:13 AM

नवी दिल्लीः शिवसेना (Shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  गट आणि एकूणच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु आहे. आजच्या सुनावणीत सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेसंबंधी निर्णय घ्यावा. धनुष्यबाण चिन्हासंबंधी दोन्ही पक्षांनी बाजू मांडावी, असं कोर्टानं म्हटलं. मात्र आमदार अपात्रतेसंबंधी निर्णय घेतल्याशिवाय निवडणूक आयोगाचा निर्णय घेता येऊ शकणार नाही, असा युक्तिवाद शिवसेनेतर्फे करण्यात आला.

कपिल सिब्बल काय म्हणाले?

  • शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण घटनेचा वाद कधी सुरु झाला आणि हे तीन दिवस का महत्त्वाचे आहेत, हे सांगितलं.
  •  20 जून रोजी या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या. 21 जून रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली. यात अनेक आमदार आले नाहीत. ते गुवाहटीला गेले.
  •  बैठकीला आले नाही, तर कारवाईला सामोरं जावं लागेल. पण आमदार आले नाहीत.
  •  तिसरा दिवस म्हणजे 29 जून रोजी या शिवसेनेच्या आमदारांनी भाजपसोबत म्हणजेच विरोधी पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन केलं.
  •  विधिमंडळातील बैठकीला आमदार आले नाहीत. मग भाजपसोबत सरकार स्थापनेवेळी कसे आले, हीच पक्षविरोधी कारवाई असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
  •  त्यानंतरही 19 जुलैला एकनाथ शिंदे स्वतः निवडणूक आयोगाकडे गेले. त्यांनी कोर्टातील निकालाची वाटही पाहिली नाही. तेच स्वतः शिवसेना असल्याचं सांगत आहेत, हे चुकीचं असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी मांडला.
  • शिंदे गटाने पक्ष सोडला नसेल तर त्यांनी व्हीपचं उल्लंघन का केलं, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला.
  • शिवसेनेपासून जे आमदार , सदस्य वेगळे झाले त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार बनवायला पाहिजे होतं.
  • ते आमदार जर इतर पक्षात गेले असते तर त्यांचं सदस्यत्व गेलं असतं.  पण ते पक्षावर कब्जा करू शकत नाहीत, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
  • अशा पद्धतीने झालं तर कोणतंही सरकार पाडता येईल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.