शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, फडणवीस इतिहास रचणार?

शिवसेना उद्या अर्थात 19 जून रोजी 53 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडणार आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, फडणवीस इतिहास रचणार?
Follow us
| Updated on: Jun 18, 2019 | 12:23 PM

मुंबई : शिवसेना उद्या अर्थात 19 जून रोजी 53 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेचा वर्धापन दिन पार पडणार आहे. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिवसेनाभवनात मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर उद्या वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबतीने मुख्यमंत्री शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याचे संकेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही भूमिका घेण्याची शक्यता आहे.

जर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, तर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच अन्य पक्षातील मुख्यमंत्री हजर असतील. एखाद्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनी दुसऱ्या पक्षाचा महत्त्वाचा नेता हजर राहण्याची ही बहुदा पहिलीच घटना ठरू शकते.

माटुंगा येथील षण्मुखांनाद सभागृहात सायंकाळी 5 वाजता शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही, यासंदर्भात शिवसेनेचे मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेनेच्या व्यासपीठावर यापूर्वी कोण कोण?

यापूर्वी शिवसेना स्थापनेनंतर 70 च्या दशकात शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तसेच दिवंगत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनीही शिवसेनेच्या व्यासपीठावर जात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.