Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशा विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार

दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिली आहे.

Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशा विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
केंद्रीय निवडणूक आयोगImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 8:30 AM

मुंबई – सुप्रीम कोर्टात (Supreme Court)  पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्या आधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे (Shivsena) पाऊल उचलले आहे . आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब मेंशन करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) वेळ दिली आहे.  शिवसेनेतील काही आमदारांनी आपली वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून दोन्ही गटात शिवसेना आमची असल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांची शिवसेना असंही शिंदे गटात समील झालेल्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तर काही नेत्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर आत्ता काहीचं बोलू शकत नसल्याचं सांगितलं आहे.

8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे

शिवसेनेतील बंडखोरीनंतर हे प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्य-बाण ’ या निवडणूक चिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने आपला दावा केला आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आता दोन्ही गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. शिवसेनेच्या दोन तृतीयांशहून अधिक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारविरोधात बंड केल्यानंतर आणि शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर गेल्या महिन्यात शिवसेनेचे दोन गट झाले होते. शिंदे यांनी 30 जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शिवसेना कोणाची आहे हे ठरवणे दुर्दैवाची गोष्ट आहे

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमत सिद्ध करण्यासाठी नोटिसा पाठवल्यामुळे शिवसेना पक्षातील संघर्ष 8 ऑगस्ट रोजी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व पक्षावर निवडणूक आयोग प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली होती. निवडणूक आयोग त्यांच्याच संघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला धक्कादायक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, दिल्लीला आमचा पक्ष बरबाद करायचा आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत. शिवसेना कोणाची आहे हे ठरवणे दुर्दैवाची गोष्ट आहे. शिवसेनेवर ही वेळ केवळ बंडखोरांमुळे आली असून महाराष्ट्रातील 11 कोटी जनता ते पाहत असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.