खोणी ग्रामपंचायतीत शिवसेनेचा झेंडा फडकला, आगामी निवडणुकाही जिंकण्याचा श्रीकांत शिंदेंचा दावा
खोणी ग्रामपंचायतीत शिवसेनेचा झेंडा फडकला, आगामी निवडणुकाही जिंकण्याचा श्रीकांत शिंदेंचा दावा(shiv sena win sarpanch election in khoni gram panchayat)
कल्याण : तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतमध्ये अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या ग्रामपंचायतमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये सरपंच पदासाठी चुरस होती. शिवसेनेच्या वंदना ठोंबरे आणि मनसेच्या जयश्री ठोंबरे यांच्यात सरपंच पदासाठी चुरस रंगली होती. सरपंच पदासाठी शिवसेनेने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वंदना ठोंबरे विजयी झाल्या. वंदना ठोंबरे यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी योगेश ठाकरे यांची निवड झाली. काल कोरम पूर्ण नसल्याने सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक स्थगित झाली होती.(shiv sena win sarpanch election in khoni gram panchayat)
काल स्थगित करण्यात आली निवडणूक
कल्याण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमध्ये 8 फेब्रुवारीची तारीख निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आली. कल्याण तालुक्यातील 11 पैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडली. 10 ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2 आणि एक अपक्ष उमेदवार सरपंच पदी निवडून आले. मात्र संवेदनशील मानली जाणाऱ्या खोणी ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले 11 सदस्य वेळेवर न पोहोचल्याने खोणीतील सरपंच पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. काल केवळ पाच सदस्य उपस्थित होते. कोरम पूर्ण नसल्याने विस्तार अधिकारी यांनी कालची निवडणूक आज घेतली. आज पार पडलेल्या निवडणुकीत एकूण 9 सदस्य उपस्थित होते.
सरपंच पदासाठी सेना-मनसेत चुरस
सरपंच पदासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये चुरस होती. भाजपचे निवडून आलेले दोन सदस्य कोणाला मतदान करतात यावर सरपंच पदाची निवडणूक अवलंबून होती. मात्र निवडणुकीच्या वेळी 11 पैकी फक्त 9 सदस्य उपस्थित राहिले यात पाच सदस्य शिवसेना, तीन सदस्य मनसे आणि एक राष्ट्रवादीचा सदस्य उपस्थित होता. राष्ट्रवादीच्या सदस्याने तटस्थ भूमिका घेतली. तर दोन सदस्य उपस्थित राहिल्याने 9 पैकी 5 मत शिवसेनेच्या बाजूने पडल्याने शिवसेनेच्या वंदना ठोंबरे हे सरपंच पदी निवडून आल्या. उपसरपंच पदासाठी फक्त एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने योगेश ठाकरे उपसरपंच पदी निवडून आले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना जिंकणार असा दावा कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला आहे.(shiv sena win sarpanch election in khoni gram panchayat)
लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!https://t.co/HZdkXrDoMB#DelhiPolice | #deepsidhu | #FarmersProtest | #TractorRally
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
इतर बातम्या
म्हणून आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो, नवनीत राणांची लोकसभेत फटकेबाजी
ठाकरे सरकार आणि आमदार प्रताप सरनाईकांविरुद्ध सोमय्यांची लोकायुक्तांकडे याचिका