पुन्हा शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, औरंगाबादेत शिवसेनेचे दोन गट आपसात भिडले

शिवसेनेतला अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. आज औरंगाबादेतही पुन्हा तेच झालंय. वरुण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात पुन्हा शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. हा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पुन्हा शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर, औरंगाबादेत शिवसेनेचे दोन गट आपसात भिडले
शिवसेनेचे दोन गट आपसात भिडलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 8:25 PM

औरंगाबाद : शिवसेनेतला (Shiv sena Dispute) अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. आज औरंगाबादेतही (Aurangabad dispute) पुन्हा तेच झालंय. वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या कार्यक्रमात पुन्हा शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. हा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर पुन्हा उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात जोरदार मारमारी झाली आहे. वरुण सरदेसाई यांच्या मेळाव्यानंतर जोरदार मारामारी झाली. युवासेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा यावेळी झाला. शेकडो कार्यकर्ते यावेळी भिडले. तब्बल 10 मिनिटांपासून मारामारी सुरु झाली. युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलच तापलं होतं. काही काळानंतर हा वाद शांत झाला. मात्र तोपर्यंत चांगलाच हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

दोन गट आपसात भिडले

सुरूवातीला दोन गट आमनेसामने आल्यानंतर चांगलाच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये खेचाखेची सुरू झाली. त्यानंतर हे दोन आपसात भिडले आणि तुबळ हाणामारी झाली. वरूण सरदेसाई निघून गेल्यानंतर हा राडा सुरू झाला. वरूण सरदेसाई यांच्या कार्यक्रमात राडा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही त्यांच्या कार्यक्रमात राडा झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते. आता या राड्यावर अजून तरी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये.

राजेंद्र जंजाळे काय म्हणाले?

राजेंद्र जंजाळे यांनी या राड्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  आम्हाला माहीत नाही मारामारी करणारे आमचे कार्यकर्ते आहेत का? अशी शंका त्यांनी उपस्थित केलीय. तसेच मारामारी करणाऱ्यांची सगळी माहीती घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  मात्र कार्यक्रमाला गालबोट लावणाऱ्यांवर कारवाई केल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच  राडा करणारे युवासेनेच पदाधिकारी नव्हते, असेही ते म्हणाले आहेत.  गेटमधून बाहेर पडताना किरकोळ कारणावरून भांडण झाल्याची माहीती मिळाली आहे, असेही ते म्हणाले. तसेच राडा करणारे बाहेरचे असल्यास आम्ही त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना आता काय कारवाई करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या राड्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, एवढं मात्र नक्की.

येऊ का ‘झाडू’ मारायला?, दिल्ली, पंजाब जिंकल्यानंतर ‘आप’चा मुंबई महापालिकेवर डोळा; सर्व जागा लढण्याची घोषणा

सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही, म्हणूनच चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागतात: devendra fadnavis

‘तुकड्यावर जगणारांनी शहाणपणा शिकवू नये’, सदाभाऊंचा मिटकरींवर पलटवार; पवारांवरील टीकेवरुन दोघांत जुंपली

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.