भाजपचं सरकार असलेल्या राज्यातूनही उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी लोकं शिवतीर्थावर!

फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून दसरा मेळाव्यासाठी लोकं शिवाजी पार्कवर आले आहेत.

भाजपचं सरकार असलेल्या राज्यातूनही उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी लोकं शिवतीर्थावर!
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाकडे लक्षImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 10:20 AM

सचिन गवाणे, TV9 मराठी, मुंबई : दसरा मेळाव्याची (Shivsena Dussehra Melava) जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आलीय. ठरल्याप्रमाणे शिवाजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनेचा दसरा मेळावा आज होणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा, यासाठी न्यायालयीन लढाही शिवसेनेला द्यावा लागला होता. अखेर आज होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातले शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीय. अनेकजण रवानाही झालेत. बहुसंख्य दाखलही झालेत. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ऐकण्यासाठी फक्त राज्यातीलच नव्हे, वर परराज्यातील शिवसैनिकही आले असल्याचं पाहायला मिळालंय. विशेष म्हणजे भाजपचं सरकार असलेल्या राज्यातील लोकही शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आलेत.

उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी, शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी चक्क मध्य प्रदेश आणि झारखंड मधून शिवसैनिक आले आहेत. ट्रेनने आलेल्या या शिवसैनिकांनी शिवाजी पार्क गाठलंय. शिवसेनेच्या भगव्या रंगात सामील होईल, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आपण आलो आहोत, असं त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

झारखंडवरुन आलेल्या एका शिवसैनिक महिलेसोबत टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. या महिलेनं आपण गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेला ओळखते. दसरा मेळावा पाहत आले आहे. तर मागच्या तीन वर्षांपासून दसरा मेळाव्याला येतही असल्याचं म्हटलंय. झारखंडचे शिवसेनेचे संघटनमंत्रीदेखील यावेळी ट्रेनने मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, मध्य प्रदेशातील उज्जैन येथूनही शिवसैनिक शिवाजी पार्क येथे दाखल झालेत. शिवसेना फुटल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. शिवसेनेला कमजोर करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही शिवतीर्थावर आलो आहोत, असं मध्य प्रदेशातून आलेल्या शिवसैनिकांनी म्हटलंय. आम्ही निष्ठावंत आम्ही उद्धव साहेबांसोबत, अशा आशयाचे बॅनर लावून शिवसैनिक राज्यात दाखवण्यात आलेत.

शिवाजी पार्क आणि दादरच्या शिवसेना भवन परिसरात जंगी तयारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटही बीकेसीवर दसरा मेळावा घेतो आहे. त्यामुळे आजच्या या दोन्ही दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.