माझ्यात क्षमता, कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडेल : शिवेंद्रराजे भोसले

विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) सर्वात केंद्रस्थानी राहिलेला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. आता निवडणुकीनंतरही सातारा (Politics of Satara) पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे.

माझ्यात क्षमता, कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडेल : शिवेंद्रराजे भोसले
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 7:46 PM

सातारा : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) सर्वात केंद्रस्थानी राहिलेला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. आता निवडणुकीनंतरही सातारा (Politics of Satara) पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale on Ministership) यांनी आपण भाजपमध्ये विनाअट प्रवेश केल्याचं सांगतानाच कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली तर नक्की पार पाडेल. माझ्यात ती क्षमता आहे, असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे साताऱ्यात चर्चेला उधाण आले आहे. शिवेंद्रराजेंना मंत्रीपद मिळणार का आणि मिळाले तर कोणते याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात साताऱ्यात झालेलं पक्षांतर, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेल्या प्रचारसभा या घडामोडींनी साताऱ्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. यात साताऱ्याच्या उदयनराजे भोसलेंचा दारुण पराभव झाला. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळवलं. आता त्यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार याबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता शिगेला गेली आहे.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “मी भाजपमध्ये विनाअट प्रवेश केला. पक्षप्रवेश करताना मी कोणताही मंत्रिपदाचा शब्द घेतला नव्हता. मात्र, मला कोणत्याही मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली, तर ती जबाबदारी मी नक्की पार पाडेन. माझ्यात त्या क्षमता आहेत.”

मी सातारा विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामं केली आहेत. त्याचबरोबर जनतेचा आमच्या घरावर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं मी यावेळी चौथ्यांदा आमदार झालो. येणाऱ्या काळात मी मतदारसंघातील हद्दवाढीचा, एमआयडीसी, पाणी योजना आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असंही शिवेंद्रराजे यांनी नमूद केलं.

शिवेंद्रराजेंनी उदयनराजे यांच्या पराभवावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, “आम्ही पक्ष म्हणून काम केलं. मात्र, याबाबत आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शरद पवारांच्या एका सभेनं उदयनराजे पडले असं म्हणता येणार नाही. तसं असतं तर शशिकांत शिंदे पराभूत झाले नसते. मलाही मताधिक्य मिळालं नसतं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.