उदयनराजे कुठं आहेत? बंधुराजांचा विषय रामराजेंना विचारला पाहिजे, शिवेंद्रराजेंची मिश्किल टिप्पणी

राज्यात सहकारी क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण तापलं आहे.

उदयनराजे कुठं आहेत? बंधुराजांचा विषय रामराजेंना विचारला पाहिजे, शिवेंद्रराजेंची मिश्किल टिप्पणी
शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले रामराजे निंबाळकर
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 7:42 AM

सातारा: राज्यात सहकारी क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलचे 11 संचालक बिनविरोध विजयी झालेले आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांची जागा राष्ट्रवादीसाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. सहकार पॅनेलकडून सध्या प्रचार जोरात सुरु आहे. सहकार पॅनेलचे नेते आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या जागेचा निर्णय एक दोन दिवसात मार्गी लागेल, असं म्हटलंय. तर, बिनविरोध विजयी झालेले राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले प्रचारात दिसत नाहीत, असं विचारलं असता शिवेंद्रराजे भोसले यांनी बंधुराजांचा विषय रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारला पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणी केलीय.

सहकार पॅनेलचे सदस्य विजयी होणार

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीच्या निमित्ताने सहकार पॅनेलचा कार्यकर्ता मेळावा कराडमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी या मेळाव्याला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, सह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

उदयनराजेंचा विषय रामराजेंना विचारयला हवा

बिनविरोध निवडून आलेले उदयनराजे भोसले प्रचारात दिसत नाहीत ते कुठे आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी शिवेंद्रराजे भोसले यांना विचारले. बंधुराजांचा विषय रामराजेंना विचारयला हवा, अशी मिश्किल टिप्पणी केलीय.

शशिकांत शिंदे यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील उमेदवार ज्ञानदेव रांजणेमुळे त्यांची जागा अडचणीत आहे का ?, असं विचारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी सावध पवित्रा घेतला. शिंदे यांच्या जागेला कसलीच अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असे ते म्हणाले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येवू लागलीय तसं तसे जिल्हा बॅंक निवडणुकीतील रंगत वाढत असल्याचं चित्र दिसू लागले आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक

खरेदी विक्री – आमदार मकरंद पाटील कृषी प्रक्रिया – शिवरूपराजे खर्डेकर गृहनिर्माण – खासदार उदयनराजे भोसले भटक्या विमुक्त जमाती – लहू जाधव अनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंत औद्योगिक व विणकर – अनिल देसाई बिनविरोध

प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ

सातारा – आमदार शिवेंद्रराजे भोसले फलटण – रामराजे नाईक-निंबाळकर खंडाळा – दत्तानाना ढमाळ वाई – नितीन पाटील महाबळेश्वर – राजेंद्र राजपुरे

इतर बातम्या:

बिनविरोधची चर्चा फिस्कटली, सहकारमंत्री सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!

सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलचा वरचष्मा, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध

Shivendraraje bhosale comment on Udaynraje Bhonsle participation in Satara DCC Bank election campaign

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.