अखेर भुजबळांच्या खांद्यावर भगवी शाल, शिवसैनिक म्हणाले, ‘साहेब लवकर या’

मंगळवारी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या भुजबळांना (Chhagan Bhujbal Yeola) भेटून स्थानिक शिवसैनिकांनी आपण शिवसेनेत लवकरात लवकर प्रवेश करावा, असा आग्रह करत साकडं घातलं.

अखेर भुजबळांच्या खांद्यावर भगवी शाल, शिवसैनिक म्हणाले, 'साहेब लवकर या'
Follow us
| Updated on: Sep 03, 2019 | 4:56 PM

नाशिक : गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या बैठका, शिवस्वराज यात्रा आणि सभांकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal Yeola) यांनी पाठ फिरवली असल्याचं दिसतंय. अनेक दिवसांपासून ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यातच मंगळवारी येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या भुजबळांना (Chhagan Bhujbal Yeola) भेटून स्थानिक शिवसैनिकांनी आपण शिवसेनेत लवकरात लवकर प्रवेश करावा, असा आग्रह करत साकडं घातलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचे वादळ सुरू आहे. मी येथेच असल्याचं वक्तव्य करत शिवसेनेत जाणार नसल्याचं ठामपणे स्पष्टीकरण न दिल्याने भुजबळ हे शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीतच राहणार, असा प्रश्न सध्या कार्यकर्त्यांना पडलाय.

येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील विंचूर सह अनेक गावात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या भुजबळांना विंचूर येथील शिवसैनिकांनी भेटून शिवसेनेत प्रवेश करावा, असं साकडं घातलं आणि भगवी शाल देऊन सत्कार केला. यावेळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देण्यात आल्या.

वाचा – तुम्ही राणे घ्या, आम्ही भुजबळ घेतो! छगन भुजबळांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशामागचं राजकारण

यावेळी पत्रकारांनी विचारले असता, सर्व पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी विविध विकासकामांच्या उद्घाटन लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले असल्याचं सांगत, भुजबळांनी यावर जास्त बोलणं टाळलं. यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीतच राहणार हा सर्वांनाच प्रश्न पडलाय.

गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू झालेली शिवस्वराज्य यात्राही नगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आली. त्यादरम्यान छगन भुजबळ गैरहजर होते. भुजबळांची प्रकृती ठिक नसल्याचं या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. तर दुसऱ्याच दिवशी भुजबळ हे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमासाठी व्यस्त असल्याचं दिसून आलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.