दाढी करण्यासाठी ‘हीच ती वेळ’, तीन वर्षानंतर शिवसैनिकाचं स्वप्न पूर्ण होणार
शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत दाढी न काढण्याचा संकल्प करणाऱ्या जालन्यातील युवकाच्या (Jalna Shivsena activist stop shaving) आशा पल्लवीत झाल्या आहेत.
औरंगाबाद : शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत दाढी न काढण्याचा संकल्प करणाऱ्या जालन्यातील युवकाच्या (Jalna Shivsena activist stop shaving) आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘हीच ती वेळ’ म्हणत विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवून देणाऱ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं दिसत असल्याने आता या युवकाची देखील दाढी करण्याची वेळ (Jalna Shivsena activist stop shaving) आली आहे. हर्षवर्धन त्रिभुवन असं या शिवसैनिकाचं नाव आहे.
हर्षवर्धन त्रिभुवन हा उच्चशिक्षित युवक आहे. हाडाचा शिवसैनिक असलेल्या हर्षवर्धनने तीन वर्षांपूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊपर्यंत दाढी न करण्याचा निर्णय घेतला. सध्या तो एका खासगी रुग्णालयात काम करतो आणि कायद्याचं शिक्षण घेतो. आपल्या संकल्पाबद्दल बोलताना हर्षवर्धन म्हणाला, “दाढी न करण्याचा निर्धार ही कुठलीही अंधश्रद्धा नसून माझी श्रद्धा आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि मी दाढी करेन.”
हर्षवर्धनवर लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव आहे. त्यामुळे त्याने तीन वर्षांपूर्वी 27 नोव्हेंबरला जन्मदिनाच्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच दाढी कापेन, असा निर्धार केला. दररोज आरशात बघताना वाढलेली दाढी पाहून शिवसेना मजबूत करण्याची आठवण येत राहील. म्हणून हा निर्धार केल्याचंही मत हर्षवर्धनने व्यक्त केलं.
मागील 3 वर्षांच्या काळात लोकांनी अनेक चेष्टा मस्कीरीच्या प्रतिक्रिया दिल्याचंही हर्षवर्धन सांगतो. तो म्हणाला, “दाढी वाढवत असताना अनेकांनी माझी टिंगल उडवली. चेष्टा मस्करी केली. घरातही अनेक अडचणी आल्या. मात्र, घेतलेला निर्धार मागे घ्यायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे केलेला निर्धार मोडला नाही. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे मी आनंदी आहे.”
आता ज्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, त्यादिवशी पूर्ण दाढी करेन, असंही हर्षवर्धनने नमूद केलं.