कर्जमाफीचे ग्रँड सेलिब्रेशन, शिवसेनेकडून शेतकऱ्यांना 100 किलो पेढे वाटप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा (Shivsena farmer loan waiver announcement) केली. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा (Shivsena farmer loan waiver announcement) केली. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पहिल्याच निर्णयाचं बीड जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. आज (22 डिसेंबर) आठवडी बाजाराचे (Shivsena farmer loan waiver announcement) निमित्त साधून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बाजारातील शेतकऱ्यांना तब्बल 100 किलो पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे अनोखे स्वागत केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी काल दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ज्या गोरगरीब शेतकऱ्याचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल. मी आज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करतो. ही योजना मार्चपासून लागू होईल. मधले दोन महिने सरकारला तयारीसाठी पाहिजे आहेत. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. या योजनेतील पैसा थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जाईल. याला कोणत्याही अटी शर्तींचा अडथळा येणार नाही.”
नव्या कर्जमाफीसाठी कोण पात्र? कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी काय?
- राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत
- ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
- ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होईल
- ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होईल.
- शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल
- कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज नाही.
- शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील
- आधार लिंक असलेल्या खात्यात थेट कर्जमाफी मिळणार
- मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु
- मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना कर्जमाफी मिळणार
- जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पात्र असणार