शिंदे सरकारची बहुमत चाचणी, आदित्य ठाकरे ऐनवेळी सभागृहात पोहोचले, त्यांच्या या ‘उशीरा’ची सर्वत्र चर्चा

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंना विधीमंडळात यायला उशीर

शिंदे सरकारची बहुमत चाचणी, आदित्य ठाकरे ऐनवेळी सभागृहात पोहोचले, त्यांच्या या 'उशीरा'ची सर्वत्र चर्चा
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 12:13 PM

मुंबई : आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यासह देशाचं या बहुमत चाचणीकडे लक्ष लागलं होतं. अश्यावेळी मविआसाठी एक एक मत महत्वाचं आहे. अश्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सभागृहात पोहोचायला उशीर झाला. त्यांच्या या उशीरा येण्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड केलं. अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण त्यांची खरी परिक्षा काल आणि आज होती. कारण काल विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर आज बहुमत चाचणी पार पडली. एवढ्या महत्वाच्या दिवशी आदित्य ठाकरे अनुपस्थित राहतात की काय, असं वाटत असतानाच ते ऐनवेळी सभागृहात दाखल झाले.

आदित्य ठाकरेंना उशीर

बहुमताचा प्रस्ताव मांडला गेला होता. बहुमत चाचणीला सुरूवात होणार होती. काही क्षणात सभागृहाचे दरवाजे बंद होणार होते. पण आदित्य ठाकरे अद्याप दाखल आले नव्हते, मविआच्या नेत्यांमध्ये धाकधुक होती. ऐन मोक्याच्या प्रसंगी आदित्य ठाकरे दाखल झाले अन् मविआच्या नेत्यांना हायसं वाटलं.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे आवाजी मतदानाला गैरहजर

विधानसभेचं कामकाज बरोबर 11 वाजता सुरू झालं. त्यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे सभागृहात हजर नव्हते. आदित्य ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले. तोपर्यंत आवाजी मतदान झालं होतं. विधानभेचे दरवाजे बंद होत असतानाच ठाकरे सभागृहात आले.

झिशान सिद्दीकी अन् धीरज देशमुख गैरजर

शिंदे सरकारची बहुमत चाचणी होत होती. यावेळी कालची अध्यक्षपदाची निवडणूक पाहता शिंदे गट आणि भाजप हा ठराव जिंकेल असं वाटत होतं. पण मविआचे काही नेते या चाचणीला गैरहजर होते. त्यामुळे ते बहुमत चाचणीला मुकले.

चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला मुकले

उशीरा आल्याने अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार बहुमत चाचणीला मुकले.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.