Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे-वरुण सरदेसाई वाद पेटला, भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा युवासेनेचा प्रयत्न

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. | Varun Sardesai and Nitesh Rane matter

नितेश राणे-वरुण सरदेसाई वाद पेटला, भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा युवासेनेचा प्रयत्न
या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले.
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 12:33 PM

नाशिक: शिवसेना नेते वरुण सरदेसाई आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. (Shivsena workers set free stray dogs in bjp office nashik Maharashtra)

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. मात्र, आगामी काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. सचिन वाझे बेटिंगवाल्यांकडून पैसे उकळतात. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती?, असे सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचे फोनवरील संभाषण आहे. याप्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपास करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती.

वरुण सरदेसाईंनी काय म्हटलं?

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या :

मला नोटीस पाठवलीत तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन; नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना इशारा

वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो पण तो पुढे कुणाला देतो?; नितेश राणेंचा गंभीर आरोप

नितेश राणेंनी खंडणीचा आरोप केलेले वरुण सरदेसाई कोण आहेत?

(Shivsena workers set free stray dogs in bjp office nashik Maharashtra)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.