Ratnagiri Elections | रत्नागिरीतील नगरपंचायत निवडणुकीत उलथापालथ, शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी, नव्या समीकरणांचा आमदार कदमांना फटका
32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांनी लक्ष घातल्याचं दिसून येत आहे.
रत्नागिरी: महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची (Nagar Panchayat) रणधुमाळी सुरु आहे. 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांनी लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) आणि मंडणगड (Mandangad ) नगरपंचायत निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. कारण वरिष्ठ पातळीवरील आदेशाप्रमाणे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची घोषणा करण्यात आलीय. दोन्ही पक्ष एकमेकांचे त्या ठिकाणचे कट्टर विरोधक असताना आघाडीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानं जिल्ह्यात तर्क वितर्क सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय हा आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासाठी धक्का असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
शिवेसना राष्ट्रवादी काँग्रेस कट्टर विरोधक तरी आघाडी
दापोली आणि मंडणगडमध्ये मुळातच राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघे या ठिकाणचे कट्टर विरोधक असताना ही आघाडी झालीय. या नवीन समीकरणामुळे विद्यमान आमदार योगेश कदम यांना मोठा फटका बसलाय. कारण रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे परस्पर विरोधत आहेत. मात्र असं असताना देखिल वरिष्ठ पातळीवरच्या आदेशामुळे इथं सेना आणि राष्ट्रवादीत आघाडी झालीय.
इतर पक्ष स्वबळावर
दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडी करुन लढवणार आहे तर मनसे, काँग्रेस आणि भाजप निवडणुकीत स्वतंत्र लढणार आहेत. दापोली आणि मंडणगड नगपंचायत निवडणुकीत प्रत्येकी 17 जागा आहेत.
अनिल परब यांना सर्वाधिकार
शिवसेनेनं मंडणगड दापोली नगरपंचायत निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी अनिल परबांकडे दिल्याची सूत्रांची माहिती आहे. परब यांनाच तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत. दापोली आणि मंडणगड या नगपंचायतीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
अर्ज दाखल करणे: 1 ते 7 डिसेंबर अर्जांची छाननी : 8 डिसेंबर मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 निकाल : 22 डिसेंबर
इतर बातम्या:
Eknath Shinde: नगरपंचायत निवडणुकीनंतर नगरपालिकेची रणधुमाळी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Shivsena and NCP take decision of alliance for Mandangad and Dapoli Nagarpanchayat Election it is setback for Yogesh Kadam