खासदार भावना गवळींचा राजेंद्र पाटणींशी वाद, भरचौकात बडवून पाय तोडू, शिवसेना आक्रमक

महिला खासदाराचा झालेला अपमान यवतमाळच्या शिवसैनिकांना जिव्हारी लागला आहे. (Shivsena Angry on Bhavana Gawali and Rajendra Patni conflict)

खासदार भावना गवळींचा राजेंद्र पाटणींशी वाद, भरचौकात बडवून पाय तोडू, शिवसेना आक्रमक
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 9:33 PM

यवतमाळ : कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी आणि शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली होती. या वादाचे पडसाद आज यवतमाळमध्ये उमटले. यवतमाळमधील शिवसैनिकांनी यवतमाळच्या दत्त चौकात आमदार पाटणी यांच्याविरोधात आंदोलन केले. (Shivsena Angry on MP Bhavana Gawali and BJP MLA Rajendra Patni conflict)

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा कारंजा येथील भाजपाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी अर्वाच्य भाषेत बोलून अपमान केला. महिला खासदाराचा झालेला अपमान यवतमाळच्या शिवसैनिकांना जिव्हारी लागला आहे. यानंतर शिवसैनिकांनी आमदार राजेंद्र पाटणी यांचे पोस्टर्स दत्त चौकात तुडवले. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे पाटणी हे यवतमाळात आल्यास त्यांना भर चौकात बदडू, तसेच त्यांचे पाय तोडू, असा इशारा दिला आहे.

नेमकं प्रकरणं काय?

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होण्यापूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली.

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी खासदार भावना गवळी यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावेळी आमदार समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी भावना गवळींविरोधात घोषणाबाजी केली.

खासदार भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याने वाशीम शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील बाजरपेठ बंद करण्याच आवाहन कार्यकर्ते दुचाकी वाहनांवरुन फिरुन करत असल्याचं दिसून आलं.

राजेंद्र पाटणी काय म्हणाले?

आम्ही नियोजन मंडळ्याच्या सभागृहात प्रवेश केल्यावर खासदार भावना गवळींनी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांचा तोल सुटला, त्या असभ्य भाषेत माझ्याशी बोलल्या. त्यांच्यासोबत पन्नास लोकं होते. खासदारांचं संतुलन का गेले समजलं नाही. लोकप्रतिनिधींनी मतभेद असले तरी बोलायलची पद्धत असते. त्यांच म्हणनं आम्ही ऐकून घेतलं वाद घातला नाही. आज घडलेला प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सांगितला, असल्याचं भाजप आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले. (Shivsena Angry on MP Bhavana Gawali and BJP MLA Rajendra Patni conflict)

संबंधित बातम्या :

शिवसेना खासदार भावना गवळींचा भाजप आमदार राजेंद्र पाटणींशी वाद, वाशिममध्ये खळबळ

शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.