बाळासाहेबांना कधी माणसं आयात करावी लागली नाही : राज ठाकरे

ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व शिवसेना भाजपमधून निवडणूक लढवतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठूनही माणसं आयात करायला लागली अशी टीका राज ठाकरे यांनी (Raj Thackeray Mumbai Rally) केली

बाळासाहेबांना कधी माणसं आयात करावी लागली नाही : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 10, 2019 | 9:58 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील इनकमिंग आऊटगोईंटवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका (Raj Thackeray Mumbai Rally) केली. “ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व शिवसेना भाजपमधून निवडणूक लढवतात, कुठे आहे पार्टी विथ डिफरन्स… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कुठूनही माणसं आयात करायला लागली (Raj Thackeray Mumbai Rally) नव्हती. त्यावेळी ती सर्व माणसं तिथे होतीच,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. गोरेगाव येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचारसभेदरम्यान (Raj Thackeray Mumbai Rally) राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले.

या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांनी (उद्धव ठाकरे) आरोळी ठोकली होती की, आम्ही राजीनामा देऊ, आता कोणाही पुढे जाणार नाही. आमची एवढी वर्ष सत्तेत सडली, आणि आमची 124 जागांवर अडली. या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे.”

सरकारच्या थापा आपण ऐकत आलो आहोत, 2014 ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा आणला होता. असे करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. हा विकास आराखडा आणणार हे मी पक्ष स्थापनेच्या वेळेस मी बोललो होतो आणि तो आणला, असेही राज ठाकरे म्हणाले.

“ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबधी देशात मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जीपासून ते शरद पवारांना देखील भेटलो. मी सुचवलं होतं की या मुद्द्यावर आपण निवडणुकांवर बहिष्कार घालावा, हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला, त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र त्याचदरम्यान कोल्हापूर आणि सांगली मध्ये महापुराने थैमान घातलं होतं. आपल्या पक्षाचे आणि इतर काही पक्षांचे कार्यकर्ते मदत कार्यात गुंतले म्हणून मोर्चा पुढे ढकलला”, असेही ते म्हाणाले.

“मला ईडीची नोटीस आली, त्यावेळेस चौकशी झाल्यावर मी बोललो होतो की ‘ईडीची चौकशी लावा काही करा माझं थोबाड बंद होणार नाही” असेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. “सध्या उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे कारण कोणी काही बोलत नाही,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“आरेतील झाडांच्या कत्तलीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, या आरेत 2700 झाडं कापली, आणि न्यायालयं देखील सरकारला साजेसं निर्णय देतं, बरं सरकारचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे होते, ते ही कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेनाप्रमुख म्हणतात की आम्हाला सत्ता द्या आम्ही आरेला जंगल घोषित करु. आम्हाला मूर्ख समजता का?” 

बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केला. मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती, आरेत कर शेड नको यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला होता. सरकारला सांगितलं होतं की जिथून मेट्रो सुरु होत आहे तिथे कारशेड करा. पण सरकारला बीपीटीची जागा कोणाच्या घशात घालायची आहे? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित (Raj Thackeray Mumbai Rally) केला.

“शिवस्मारकाचं काय झालं? अहो या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे. पण या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्याना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत अशी टीकाही त्यांनी भाजप सरकारवर केली.”

“सरकार म्हणतंय की, आम्ही 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्डयांना मुख्यमंत्री ‘विहिरी’ म्हणत आहेत का? काय बोलतंय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे. जाहीरनामे येणार आणि जाणार, तुम्ही भूलथापांना बळी पडणार… तुमच्या मनात राग आहे का नाही? तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला.”

ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल असेही ते म्हणाले.

“आज मुंबईत, ठाण्यात वाट्टेल ती लोकं येऊन राहत आहेत, ती कुठून येत आहेत, काय करत आहेत याचा सरकारला पत्ता नाही. पाकिस्तान, बांग्लादेश मधून आलेल्या घुसखोरांचे मोहल्लेच्या मोहल्ले उभे राहतात आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. पण आमच्या सणांना सरकार विरोध करतं, बंधनं आणतं” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या 370 कलमबद्दल बोलत आहेत. 370 कलम काढलं याबद्दल अभिनंदन. पण या आमच्या महाराष्ट्राच्या निवडणुकांशी काय संबंध? आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार? आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार?” असा प्रश्नही त्यांनी सत्ताधारी पक्षांना विचारला.

“जपानकडून कर्ज घेऊन 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारताय? काकोडकर समितीचा अहवाल आहे की, देशातील रेल्वेचं जाळं सुधारायला फक्त 1 लक्ष कोटींची गरज आहे. त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण निरुपयोगी बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत? अशी टीकाही राज यांनी या सभेत केली. या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, का? या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.