मंत्रिपद आणि अध्यक्षपद सेनेकडे रहावं, काँग्रेस राष्ट्रवादीला माझी विनंती, मी अध्यक्ष झालो तर आनंदच, फायरब्रँड भास्कर जाधवांची रोखठोक मतं

शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद असेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी घेतली आहे. | Shivsena Bhaskar jadhav

मंत्रिपद आणि अध्यक्षपद सेनेकडे रहावं, काँग्रेस राष्ट्रवादीला माझी विनंती, मी अध्यक्ष झालो तर आनंदच, फायरब्रँड भास्कर जाधवांची रोखठोक मतं
भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 1:06 PM

मुंबई : शिवसेनेकडे (Shivsena) असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पद मिळाले तर त्याचा मला आनंद असेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेनी आपल्या कोट्यातील मंत्रीपदाचा बळी देवू नये. असं ते म्हणाले., टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी रोखठोक उत्तरं दिली. (Shivsena Bhaskar Jadhav statement on Maharashtra Assembly Speaker and Forest ministry)

अध्यक्षपद मिळाला तर आनंद आहे पण…

अध्यक्षपद मिळाला तर आनंद आहे पण जर नाही संधी मिळाली, सभागृहात खाली बसायला दिलं तरी मी विरोधकांचा सभागृहातून नक्कीच सामना करेन, असंही भास्कर जाधव म्हणाले. यातून त्यांचा रोख वनखात्याकडे होता. एकंदरित वनखाते भूषविण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.

विधानसभा अध्यक्ष झालो तर…

जर मला विधानसभा अध्यक्ष पद दिलं तर पक्षीय भूमिका न बजावता सभागृहाच्या नियमांचा मान राखून काम करावे लागेल. विधानसभा अध्यक्ष झालो तर पक्ष म्हणून काम करता येणार नाही, असंही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं अशी चर्चा…

विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्याचं एकमत झाल्याची देखील मला समजलं आहे. विधानसभा अध्यक्षपद भास्कर जाधवांना दिलं तर जबाबदारीने ते सांभाळू शकतील, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे, असं मी ऐकलं. मात्र या चर्चेत आपण सहभागी नव्हतो, असंही भास्कर जाधवांनी सांगितलं.

…तर शिवसेनेने अध्यक्षपद घेऊ नये!

शिवसेनेचं वनखातं काँग्रेसला जाणार आणि विधानसभा अध्यक्ष शिवसेनेकडे येणार, अशा चर्चा आहेत. पण लोकहिताची खाती शिवसेनेकडे नाही, त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातलं एक मंत्री पद देवून अध्यक्षपद शिवसेनेनी घेवू नये, असं रोखठोक मत भास्कर जाधवांनी मांडलं.

वनखातं आणि अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं

महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टिकणे महत्वाचे आहे. त्यासाठीचा अजेंडा ठरलेला आहे, हे जरी खरं असलं तरी, तुझं किती-माझं किती करण्यापेक्षा वनखाते शिवसेनेकडे ठेवून विधानसभा अध्यक्षपद देखील शिवसेनेला द्यावे, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केलीय.

चंद्रकांत पाटील, शरद पवारांकडून कौतुकाची थाप

भाजपकडून दोन दिवसांच्या अधिवेशन गाजवल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा कौतुक केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माझं अभिनंदन केलं. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली, असंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.

(Shivsena Bhaskar Jadhav statement on Maharashtra Assembly Speaker and Forest ministry)

हे ही वाचा :

…तर मी अध्यक्ष होण्यास तयार, पण सेनेनं वनमंत्रिपद सोडू नये, भास्कर जाधवांचं वक्तव्य

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.