सोशल मीडियावर शिवसेनेची खिल्ली, विनोदांचा पाऊस
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर […]
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.
शिवेसना-भाजपच्या या युतीवर मात्र अनेकांनी टीका केली. शिवसेना आणि भाजपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे, तर शिवसेनेची खिल्ली उडवणारे अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. शिवसेना गेली साडेचार वर्ष भाजपसोबत सत्तेत आहे. मात्र सत्तेत असून शिवसेनेने नेहमीच विरोधकाची भूमिका घेत भाजपवर टीका केली. विरोधकाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत अनेकदा स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आज शिवसेना भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. याचा अनेकांनी विरोध करत सोशल मीडियावर शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावरील शिवसेनेची खिल्ली उडवणाऱ्या काही पोस्ट
अफझल खानाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शरयू आणि चंद्रभागेच्या स्नानामुळे युती मीठी नदीकाठी पवित्र झाली आता पहिले सरकार फिर मंदिर जय श्रीराम #लाचारसेना
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 18, 2019
@BabajiRinge2 युती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. फक्त हा स्क्रीन शॉट राजीनामा समजून डिलिट करून टाका ????@ameytirodkar pic.twitter.com/kQUd7MpQ4b
— Dipankar (@dipankar56_) February 18, 2019
शेवटी डरकाळ्या फोडता फोडता चड्डीतच झाली मुती.. मग काय नाईलाजाने करावी लागली ना युती… !#LacharSena @ShivSena @BJP4India @anilshidore pic.twitter.com/2YfT9rR626
— Tanaji Pise (@tanaji_pise) February 18, 2019
युती होणार कळल्यावर बिचारे शिवसैनिक #युतीरिटर्न्स pic.twitter.com/TBVvl4nplL
— PS (Pankaj Sarang) (@PVSSARANG) February 18, 2019
#नाव_घे_ग_पोरी राजीनाम्यांच्या जिवावर सर्वांना लावला चुना… कमळ रावांचं नाव घेते युती करते मी पुन्हा…! ?? #युतीरिटर्न्स pic.twitter.com/MTcUfvzsXx
— Vir Jadhav (@vir_jadhav) February 18, 2019