शिवसैनिकाकडे तन-मन आहे, पण धन नाही, वर्ध्यात शिवसेना-भाजपची धुसफूस सुरुच
वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती झाली. पण ही दिलजमाई भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्यात अजून तरी यशस्वी झालेली नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपपासून दुरावला असल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच मान्य केलंय. शिवसेनेकडे तण-मन आहे, पण धन नाही, असं वर्ध्याचे शिवसेना संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी म्हटलंय. त्यामुळे शिवसेनेचा भाजपवर असणारा डावलण्याचा […]
वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती झाली. पण ही दिलजमाई भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्यात अजून तरी यशस्वी झालेली नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपपासून दुरावला असल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच मान्य केलंय. शिवसेनेकडे तण-मन आहे, पण धन नाही, असं वर्ध्याचे शिवसेना संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी म्हटलंय. त्यामुळे शिवसेनेचा भाजपवर असणारा डावलण्याचा रोष व्यक्त करताना धन या बाबीकडेही लक्ष वेधलं जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडेही लक्ष असू द्या, असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय. या पत्रकार परिषदेला संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, बाळा शहागडकर उपस्थित होते.
शिवसैनिक तन, मनाने काम करेल, धनाचे भाजपने पाहावे. यासाठीच भाजपावर दबावासाठी शिवसेनेची ही पत्रकार परिषद होती का, असा सवाल विचारला जातोय. भाजपाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना विचारात घ्यावे, शिवसेनेला डावलून भाजपा निवडणूक लढू शकत नाही. भाजपा उमेदवाराने याकडे लक्ष द्यावे, भाजपा यजमान आहे, त्यांनी शिवसेनेला बोलवावे, अशीही मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
नामांकन अर्ज भारताना शिवसेनेच्या नेत्याशी चर्चा झाली. मात्र घाई झाल्याने काहींशी संपर्क होऊ शकला नाही. शिवसेनेचे नेते आमच्या सोबतच आहेत, असा दावा भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांनी केला. निवडणूक काळात शिवसेना-भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता नाही, असाही दावा भाजपा नेत्यांनी केला.
भाजपा-शिवसेनेत युती झाली, उमेदवार निश्चित झाले आणि अर्ज भरायला सुरुवातही झाली. मात्र साडे चार वर्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या कार्यकर्त्यांसह नेत्यांचे मन अद्याप मिळालेले नाही हे वर्ध्यात दिसून आलंय.