चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय?, फडणवीस म्हणतात समन्वयानं काम करु!

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलंय. महत्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गरज नसल्याचं राणे म्हणालेत. याबाबत विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय?, फडणवीस म्हणतात समन्वयानं काम करु!
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 3:58 PM

नागपूर : चिपी विमानतळ उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेकडून चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलंय. महत्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गरज नसल्याचं राणे म्हणालेत. याबाबत विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. (Devendra Fadnavis’s opinion on Narayan Rane’s statement)

‘चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे यांचा सहभाग कुणीच नाकारु शकत नाही. राणे यांच्या काळात विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं. त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता तिथून विमान उडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशाप्रकारचं हे विमानतळ, याच्यावर फ्लाईट सुरु होणं हे कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी राणे साहेब आणि आमचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं समन्वयानंच काम करायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादाची काही लढाई नाही. राणेंचं जे काही योगदान आहे ते कुणीही नाकारु शकत नाही’, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

राणे काय म्हणाले?

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाबाबतची तारीख जाहीर केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला येणार आहेत का? असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते.

विनायक राऊतांचा पलटवार

राणेंनी मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही, असं विधान केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर पलटवार केला. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं सांगतानाच काल 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, अशी माहिती राऊतांनी दिली.

इतर बातम्या :

आधी फडणवीस, आता शेलारांकडून राणेंच्या विधानापासून फारकत; शेलार म्हणाले, विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावं

‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis’s opinion on Narayan Rane’s statement

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.