मुंबईनंतर औरंगाबादेतही भाजप-शिवसेनेचं मानापमान नाट्य

औरंगाबाद : मुंबईतील मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनात शिवसेना-भाजपात मानापमानाचं नाटक रंगलं. नाटकाचा पुढचा भाग आता औरंगाबादेत रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. औरंगाबादेत येत्या 23 तारखेला 100 कोटींच्या रस्त्याचं भूमीपूजन आणि शहर बससेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुणालाही आमंत्रित करण्यात आलं नाही. […]

मुंबईनंतर औरंगाबादेतही भाजप-शिवसेनेचं मानापमान नाट्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

औरंगाबाद : मुंबईतील मेट्रोच्या प्रकल्पांच्या भूमीपूजनात शिवसेना-भाजपात मानापमानाचं नाटक रंगलं. नाटकाचा पुढचा भाग आता औरंगाबादेत रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. औरंगाबादेत येत्या 23 तारखेला 100 कोटींच्या रस्त्याचं भूमीपूजन आणि शहर बससेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेने आयोजित केलाय. या कार्यक्रमासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निमंत्रण दिलंय. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुणालाही आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने पैसा दिला म्हणून हे शक्य झालं तरी शिवसेना यशाचं श्रेय एकटंच घेण्यासाठी भाजपला डावलत असल्याचा आरोप भाजपने केलाय.

अखेर सारवासारव करण्यासाठी आज शिवसेनेच्या महापौरांसह काही नेते मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र इतक्या उशिराने आमंत्रण दिल्याने मुख्यमंत्री येणार का असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आधीच ठरलेले असतात. त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी हे उशिराचं आमंत्रण देण्याचा घाट शिवसेनेने घातल्याचा आरोप होतोय. विकासकामांच्या उद्घाटनावरून आता शिवसेना-भाजपात चांगलंच मानापमानाचं नाटक रंगणार असं चित्र आहे.

मुंबईत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये मेट्रोच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. तर कोस्टल रोडचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठीही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

भाजप आणि शिवसेना राज्यात जसे सत्तेत एकत्र आहेत. तसेच शिवसेना आणि भाजप औरंगाबाद महापालिकेतही एकत्र आहेत. योजनांसाठी पैसा सरकारकडून मिळणार आहे. पण श्रेय घेण्याची लढाई ही वादाचं कारण बनली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.