‘पोलिसांच्या आड लपून शिवसेनेनं चिथावणी देऊ नये’, प्रसाड लाड यांचा अनिल परबांना इशारा

| Updated on: Jun 18, 2021 | 8:18 PM

भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराच्या आड लपून भाजप भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणं सोडावं असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

पोलिसांच्या आड लपून शिवसेनेनं चिथावणी देऊ नये, प्रसाड लाड यांचा अनिल परबांना इशारा
शिवसेना नेते अनिल परब, भाजप नेते प्रसाद लाड
Follow us on

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरुन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराच्या आड लपून भाजप भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणं सोडावं असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे. दरम्यान, शिवसेना भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आणि काही महिला पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानुसार अक्षता तेंडुलकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Prasad Lad warns Anil Parab after a rally in front of ShivSena Bhavan)

दरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरुन अनिल परब यांनी आम्ही भाजप कार्यकर्त्यांना ठीक करु असा इशारा दिला होता. त्याला आता प्रसाद लाड यांनी प्रत्युतर दिलंय. मी परब यांना सांगू इच्छितो की, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करु नये. परब आणि शिवसेना पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहे. त्यांनी पोलिसांचा पदर सोडून समोर यावं आणि संघर्ष करावा. मग त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी अनिल परब यांना इशारा दिलाय.

अनिल परब काय म्हणाले होते?

अनिल परब आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवात साधताना भाजपला इशारा दिलाय. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असं परब म्हणाले. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना इशारा देत असल्यामुळे आगामी काळात भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्ह दिसून येत आहे.

शिवसेना भवनासमोर काय घडलं?

अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने बुधवारी फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

Video : ‘परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलीस आणि सरकार जबाबदार’, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

VIDEO: शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!

Prasad Lad warns Anil Parab after a rally in front of ShivSena Bhavan